Sindhudurg News : कोकण किनारपट्टीवर १ जूनपासून दोन महिने मासेमारीस बंदी; मत्स्य व्यवसाय विभागाचे आदेश 

Sindhadurg News : कोकण किनारपट्टीवर १ जूनपासून सागरी मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने या संदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.
Kokan Beach
Kokan BeachSaam tv

विनायक वंजारे 

सिंधुदुर्ग : कोकण किनारपट्टीवर १ जून ते ३१ जुलै या कालावधीत समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने काढले आहेत. या दोन महिन्याच्या काळात मासेमारी केल्यास मच्छीमारांवर कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Kokan Beach
Chalisgaon News : गिरणा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

कोकण (Kokan) किनारपट्टीवर १ जूनपासून सागरी मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने या संदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्याच्या कालावधीत सागरी मासेमारी पूर्णपणे बंद असणार आहे. या काळात मासे प्रजनन आणि बीज सवर्धन करतात. शिवाय या काळात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे या कालावधीत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सागरी मासेमारी बंद राहणार आहे. बंदी कालावधीत मासेमारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Kokan Beach
Wardha Crime : युट्यूब पाहून शिकला चोरी; मौजमस्तीसाठी वर्षभरात केल्या ९३ चोऱ्या, गोव्यात जाऊन उडवायचा पैसे

मच्छिमार करतात नौका दुरुस्ती 

राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील मासेमारी हंगामाचा आजचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून मासेमारी बंदीचा कालावधी सुरू होत असल्यामुळे मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सुरुवात केली आहे. या दोन महिन्याच्या कालावधीत मच्छिमार आपल्या नौका दुरुस्ती व रंगरंगोटी करण्याचे काम करत असतात. तसेच साधारण जानेवारी महिन्यापासून मच्छिमारीचा व्यवसाय डबघाईला गेला असून शासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी मच्छिमार गणपत केळूस्कर यांनी बोलताना सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com