UEFA Euro 2024: दिग्गज फुटबॉलपटू पॅट्रिस एव्ह्राचा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या तज्ञ पॅनेलमध्ये समावेश

UEFA Euro 2024: वर्षातील सर्वात मोठा फुटबॉल महोत्सव, युएफा युरो 2024 च्या थेट प्रक्षेपणासाठी फुटबॉल दिग्गज पॅट्रिस एव्ह्रा यांचा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या तज्ञ पॅनेलमध्ये समावेश
UEFA Euro 2024: दिग्गज फुटबॉलपटू पॅट्रिस एव्ह्राचा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या तज्ञ पॅनेलमध्ये समावेश
Patrice evrasaam tv

प्रमुख प्रसारक, सोनी स्पोर्ट्स नेटवर्कला हे जाहीर करताना आनंद होतोय, की फ्रान्स फुटबॉल संघाचे माजी कर्णधार पॅट्रिस एव्ह्रा यांचा युएफा युरो 2024 च्या थेट प्रक्षेपणासाठी तज्ञ पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. युएफा युरो 2024 स्पर्धेदरम्यान फुटबॉल एक्स्ट्रा शोमध्ये एव्ह्रा तज्ञ पॅनेलमध्ये सामील होतील आणि प्रत्येक सामन्याचे उत्कृष्ट विश्लेषण करून प्रेक्षकांचा अनुभव समृद्ध करतील.

'भारतामध्ये फुटबॉलचे घर' – सोनी स्पोर्ट्स नेटवर्क युएफा युरो 2024 चे बहुप्रतीक्षित थेट प्रक्षेपण Sony Sports Ten 2 SD & HD, Sony Sports Ten 3 SD & HD, Sony Sports Ten 4 SD & HD, Sony Ten 5 SD & HD वर प्रसारित करेल.

पॅट्रिस एव्ह्रा हे सर्वाधिक सन्मानित फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहेत, ज्यांनी 2004-2016 दरम्यान 81 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. माजी बचावपटूने क्लब फुटबॉलमध्ये 725 सामने खेळले, ज्यात 2006-2014 दरम्यान मँचेस्टर युनायटेडसाठी 379 सामने समाविष्ट होते. त्यांनी 2014-2017 दरम्यान युव्हेंटससाठी 82 सामने खेळले. डाव्या बाजूच्या या खेळाडूने मँचेस्टर युनायटेडसह 5 प्रीमियर लीग विजेतेपद जिंकली आहेत. त्यांनी इंग्लिश क्लबसह युएफा चॅम्पियन्स लीग आणि फिफा क्लब वर्ल्ड कपदेखील जिंकला आहे. शिवाय, एव्ह्रा 2015 आणि 2016 मध्ये सीरी ए विजेतेपद जिंकणाऱ्या युव्हेंटस संघाचाही भाग होता.

UEFA Euro 2024: दिग्गज फुटबॉलपटू पॅट्रिस एव्ह्राचा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या तज्ञ पॅनेलमध्ये समावेश
IPL 2025 Mega Auction: मेगा ऑक्शनमध्ये किती खेळाडूंना रिटेन करता येणार? फ्रेंचाईजींचं टेन्शन वाढलं!

पॅट्रिस एव्ह्राने अनेक पुरस्कारही जिंकले आहेत. त्यांची 2003-04 मध्ये UNFP Ligue 1 यंग प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली होती . यासह UNFP Ligue 1 टीम ऑफ द इयर 2003-04, PFA प्रीमियर लीग टीम ऑफ द इयर तीन वेळा (2006-07, 2008-09, 2009-10), FIFA FIFPro वर्ल्ड XI: 2009 आणि UEFA टीम ऑफ द इयर 2009 मध्ये स्थान मिळवले.

मुलांवरील हिंसाचार संपवण्याच्या लढाईत सामील होण्यापासून ते धर्मादाय संस्थांद्वारे लैंगिक समानता प्रोत्साहित करण्यापर्यंत, I Love This Game चळवळीद्वारे सकारात्मकता पसरवणे किंवा फुटबॉलमधील वंशभेद आणि मानसिक आरोग्य समस्यांवर प्रकाश टाकण्यापर्यंत. पॅट्रिस यांनी फुटबॉलमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर, त्यांचे लक्ष इतरांना मदत करण्यावर केंद्रित आहे.

प्रतिक्रिया:

राजेश कौल, चीफ रेवेन्यू ऑफिसर - वितरण आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि प्रमुख - स्पोर्ट्स व्यवसाय, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया:

“या वर्षातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेसाठी युएफा युरो 2024 साठी आमच्या प्रतिष्ठित पॅनेलमध्ये फुटबॉल दिग्गज पॅट्रिस एव्ह्राचा समावेश झाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. एव्ह्राची उत्कृष्ट व्यक्तिमत्व, त्यांचा अनुभव, ज्ञान आणि खेळाचे समज आमच्या प्रेक्षकांसाठी समृद्ध अनुभव सुनिश्चित करेल. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कमध्ये, आमची वचनबद्धता म्हणजे आमच्या प्रेक्षकांना मैदानावर आणि मैदानाबाहेर दोन्ही ठिकाणी उत्कृष्ट अनुभव प्रदान करणे, ज्यामुळे एव्ह्रा युएफा युरो 2024 पॅनेलमध्ये परिपूर्ण आहे.”

UEFA Euro 2024: दिग्गज फुटबॉलपटू पॅट्रिस एव्ह्राचा सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या तज्ञ पॅनेलमध्ये समावेश
IPL 2024 Final: सारखा स्कोर सारखं चेज! IPLच्या दोन फायनल स्क्रिप्टेड की योगायोग?

पॅट्रिस एव्ह्रा, माजी फ्रान्स कॅप्टन आणि सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील युएफा युरो 2024 पॅनेलिस्ट:

“भारताबद्दल माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. मी मागच्या वेळी जेव्हा भारता़त आलो होतो, तेव्हा चांगला वेळ घालवला. UEFA Euro 2024 साठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कसोबतच्या माझ्या भागीदारीसाठी मी आणखी वाट पाहू शकत नाही. सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारतातील फुटबॉलचे घर म्हणून एक महान परंपरा आहे आणि या स्पर्धेच्या प्रसारणादरम्यान माझा अनुभव आणि ज्ञान प्रदान करण्यास मी उत्सुक आहे. UEFA Euro 2024 ही जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धांपैकी एक आहे. ज्यात युरोपमधील काही सर्वोत्तम संघ आणि खेळाडू प्रतिष्ठित ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील.”

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com