OnePlus Pad  OnePlus
लाईफस्टाईल

OnePlus Pad : OnePlus चा पहिला Android टॅब लॉन्च , किंमत आणि फिचर्स जाणून घ्या

OnePlus Pad Features And Price : OnePlus ने आज त्याचा पहिला Android टॅब लॉन्च केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

OnePlus Android Tab : OnePlus ने आज त्याचा पहिला Android टॅब लॉन्च केला आहे. हा टॅब 11-इंचाच्या स्क्रीनसह येतो जो 144hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या पॅडमध्ये तुम्हाला मागील बाजूस एक कॅमेरा मिळतो जो अगदी मध्यभागी ठेवला आहे.

या पॅडबाबत कंपनीने (Company) दावा केला आहे की, सतत तासनतास हे पॅड वापरल्यानंतरही लोकांना (People) ते धरण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि ते त्यामध्ये आरामात काम करू शकतील. त्याच्या सर्व फिचर्सचे तपशील जाणून घेऊया.

OnePlus Pad ची बॅटरी -

वनप्लस पॅडमध्ये 9,510 mAh बॅटरी आहे आणि ती 67W सुपरवूक चार्जिंगसह ऑफर केली जाते. पॅड 60 मिनिटांत 1 ते 90% पर्यंत चार्ज होऊ शकतो.

OnePlus Pad चा प्रोसेसर आणि डिस्प्ले -

MediaTek Dimensity 9000 SoC प्रोसेसर आणि 12GB RAM यांना OnePlus Pad मध्ये सपोर्ट करण्यात आला आहे. OnePlus Pad मध्ये 11.61-इंच स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश दर 144 Hz, 7: 5 आस्पेक्ट रेशो आणि 2800 x 2000 पिक्सेल रिझोल्यूशन आहे.

OnePlus Pad

OnePlus Pad ची खासियत -

OnePlus Pad हे फाइल शेअरिंग, मल्टीटास्किंगसाठी स्मार्ट सॉफ्टवेअरसह येते. OnePlus ने OnePlus पॅडवरील ऑडिओ सिस्टमसाठी डॉल्बीसोबत भागीदारी केली आहे. यामध्ये तुम्हाला उत्तम आवाज असलेले चार स्पीकर मिळतात.

वनप्लस पॅडची किंमत आणि रंग -

वनप्लस पॅड सिंगल हॅलो ग्रीन कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. OnePlus ने पॅडची किंमत जाहीर केली नाही, परंतु इंटरनेटवर समोर आलेल्या माहितीनुसार, ते 24,999 रुपयांना उपलब्ध होऊ शकते. अचूक माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT