OnePlus Phone : लवकरच लॉन्च होणार OnePlus 11R 5G फोन, जाणून घ्या फीचर्स व किंमत

चीनच्या बाहेर याला OnePlus 11R 5G या रूपात लॉन्च करण्यात येणार आहे.
OnePlus 11R 5G
OnePlus 11R 5GSaam Tv

OnePlus 11R 5G : चीनमध्ये OnePlus ने त्याचे नवीन डिवाइस OnePlus 11 5G लॉन्च केले आहे आणि आता OnePlusACE 2 लॉन्च करण्याचा विचार करत आहे. चीनच्या बाहेर याला OnePlus 11R 5G या रूपात लॉन्च करण्यात येणार आहे.

OnePlus 11R 5G आणि OnePlusACE 2 या दोन्ही फोन मध्ये एक सारखे वैशिष्ट्ये असू शकतात असे चीनच्या OnePlus 11 5G या कंपनीच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे.

OnePlus 11R 5G
Realme Phone : 'चीयर्स फॉर रियल' टॅगसह लवकरच लॉन्च होणार Realme चा Coca Cola Phone, जाणून घ्या फीचर्स व किंमत

1. स्पेसिफिकेशन्स

  • OnePlus 11R 5G या फोनचा (Phone) स्टोरेज 512 जीबी आणि रॅम १६ जीबी असेल

  • त्यासोबत फास्ट चार्जिंग साठी 100w सपोर्ट सोबत 500mAH ची बॅटरी देण्यात येणार आहे.

2. कॅमेरा

  • या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा (Camera) सिस्टम देण्यात येऊ शकते.

  • त्यामध्ये प्रायमरी कॅमेरा ५०मेगापिक्सल आणि इतर दोन कॅमेरामधील एक कॅमेरा १२ मेगापिक्सल आणि दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सेलचा असणार आहे.

  • सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.

3. फीचर्स

  • ६.७ फुल एचडी डिस्प्ले+Amoled या फोन मध्ये मिळण्याची शक्यता आहे. सोबत एक स्नॅपड्रॅगन 8+ प्रोसेसर मिळणार आहे.

  • फोन मध्ये ऑक्सिजनओएस असेल असे सांगण्यात आले आहे.

  • सध्या तरी कंपनीने OnePlusACE 2 आणि OnePlus 11R 5G लॉन्च करण्याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

  • हा फोन जागतिक (World) बाजारपेठेत (Market) OnePlus 11R 5G नावाने पदार्पण करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com