Cleaning Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Cooker Cleaning Tips : जळून काळाकुट्ट झालेल्या कुकर ५ मिनिटांत चकचकीत चमकेल; जेवणातील पदार्थ येतील उपयोगात

Kitchen Tips : प्रेशर कुकर हा स्वयंपाक घरातील अविभाज्य घटक आहे. मात्र वारंवार याचा वापर होत असल्यामुळे तो लवकर खराब होतो. अशावेळी कुकरची चमक आणण्यासाठी घरगुती उपाय मदत करतात.

Shreya Maskar

स्वयंपाक घरातील कुकर रोजच्या वापरामुळे काळा पडून खराब होतो. यामुळे वेळीच त्याची स्वच्छता करणे गरजेचे असते. आपल्याला रोज कुकर नीट स्वच्छ करता येत नाही. यामुळे किमान महिन्यातून १ ते २ वेळा तरी कुकरचे डाग स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर कुकरचा चिकटपणा वाढत जातो आणि काळे डाग काढणे कठीण होऊन बसते.

सैंधव मीठ

काळाकुट्ट झालेला कुकर साफ करण्यासाठी तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता. कुकरमध्ये पाणी घालून त्यामध्ये सैंधव मीठ आणि काळे मीठ टाका. त्यानंतर मिठाच्या पाण्याने भरलेला कुकर गॅसवर ठेवून एक उकळी काढून घ्या. कुकर थंड झाल्यावर लिक्विड वॉशचा वापर करून कुकर स्वच्छ धुवून घ्या. पाण्यामुळे कुकरच्या आतील बाहेरील काळेपणा निघून जाईल.

कांद्याचा रस

कुकरच्या तळाशी लागलेला चिकट मळ दूर करायचा असल्यास तुम्ही कांद्याच्या रसाचा वापर करू शकता. एका छोट्या भांड्यात कांद्याचा रस आणि दोन चमचे व्हिनेगर घाला. हे मिश्रण एकत्र करून आतून बाहेरून संपूर्ण कुकर घासून घ्या. त्यानंतर कोमट पाण्याने कुकर स्वच्छ करा.

बेकिंग सोडा

कुकरचा जळलेला भाग काढून टाकण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. ज्या ठिकाणी कुकर जळला आहे किंवा त्यावर काळे डाग पडले आहेत. अशा ठिकाणी बेकिंग सोडा टाकून वर थोडे पाणी घालावे आणि स्क्रबरच्या साहाय्याने कुकर घासून स्वच्छ करावा.

लिंबू

कुकरचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू रामबाण उपाय आहे. एका मोठ्या भांड्यामध्ये एक संपूर्ण लिंबूचा रस घ्यावा आणि त्यामध्ये व्हिनेगर घालून एक तास चिकट आणि कुकरचा काळा भाग पाण्यामध्ये बुडवून ठेवा. कालांतराने लिक्विड वॉशचा वापर करून कुकर स्वच्छ धुवून घ्यावा.

कुकरचे झाकण कसे स्वच्छ करावे?

कुकरचे काळे झालेले झाकण स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यामध्ये बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि पाणी टाकून कुकरचे झाकण त्यात बुडवून ठेवावे. यामुळे कुकरचा चिकटपणा निघून जातो. त्यानंतर ३० मिनिटांनी कुकर कोमट पाण्याने धुवून घ्यावा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक आयोगाकडे 'ती' ऑडिओ क्लिप देऊ, बदमानी करू; ३० लाखाच्या खंडणीसाठी भाजप महिला नेत्याला धमकीचा फोन

Face Scrub: डेड स्कीन काढण्यासाठी घरीच बनवा 'हे' नैसर्गिक स्क्रब, त्वचा उजळेल

Cancer रुग्णांसाठी मोठी खूशखबर! कॅन्सरशी लढणार 'फ्रेंडली बॅक्टेरिया', कॅन्सरवरील बॅक्टेरियाचे संशोधन सुरु

Fact Check : सोनं झाडाला लागणार? कुठे सापडलंय सोन्याचं झाड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Wall Stain: डाग अच्छे है! मुलांनी भिंतीवर चित्र काढून भिंती खराब केल्या? 'या' सिंपल ट्रिक्सनं होतील साफ

SCROLL FOR NEXT