Stomach Worms Symptoms and Home Remedies in Marathi
Stomach Worms Symptoms and Home Remedies in Marathi ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Remedies for Stomach Worms: मुलांच्या पोटात जंत झाल्यानंतर शरीरात दिसतात ही लक्षणे, वेळीच घ्या काळजी

कोमल दामुद्रे

Stomach Worm Problem Information:

खराब जीवनशैली, जंक फूड आणि घाण पाण्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. उन्हाळ्यात लहान मुलांना बाहेर खेळायला अधिक आवडते. अशावेळी घाणीचे हात ते वारंवार तोंडात घालतात. सतत बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ल्याने किंवा घाण पाणी प्यायल्याने पोटात जंत होऊ शकतात.

त्यामुळे पोटदुखी आणि इन्फेक्शन सारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जेवणापूर्वी हात न धुणे, घाणेरडे आणि शिळे अन्न खाणे किंवा खराब अन्नपदार्थ खाल्ल्याने पोटात जंत होऊ शकतात. ही समस्या लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. जर तुम्हालाही मुलांमध्ये ही लक्षणे आढळल्यास त्यांच्या पोटात जंत झाली आहेत असे समजावे.

1. पोटातील जंतांची लक्षणे (Symptoms of worms in stomach) कोणती?

  • पोटदुखी

  • अतिसार किंवा उलट्या

  • गॅस आणि पोटात गोळा येणे

  • डोळा लालसरपणा

  • वजन कमी होणे

  • जीभेचा रंग पांढरा होणे

  • श्वासाची दुर्घंधी

  • रात्री मुलांचे दात वाजणे

2. हे घरगुती उपाय करा (Home Remedies For Stomach Worms)

1. ओवा

पोटात जंत झाल्यावर ओवा बारीक करुन त्याचा पावडर बनवा. त्यात समप्रमाणात गूळ मिक्स करा. त्यापासून गोळ्या तयार करुन दिवसातून तीन वेळा खा. असे ३-४ दिवस केल्याने आराम मिळेल.

2. डाळिंब

पोटात (Stomach) जंत झाल्यावर डाळिंबाची साले वाळवून त्याची पावडर एक चमचा दिवसातून ३ वेळा करा. यामुळे पोटदुखीच्या समस्येपासून ते जंताच्या समस्येवर मात करता येते.

3. कडुलिंबाची पाने

चवीला अतिशय कडू पण आरोग्यासाठी बहुगुणी असणारे कडुलिंब पोटातील जंत मारण्यासाठी गुणकारी ठरतात. कडुनिंबाच्या पानांमध्ये जीवाणूविरोधी गुणधर्म आढळतात. जे कीटकांचा नाश करतात. कडुनिंबाची पाने बारीक करुन त्यात मध मिसळून खा.

4. लसूण

पोटातील जंत मारण्यासाठी लसूण हा घरगुती उपाय आहे. यासाठी लसणाची चटणी बनवून खाऊ शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Atishi Marlena: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण भाजपचं षडयंत्र; आप नेत्या आतिशींचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live: अवैध होर्डिंगवर कारवाईचे आदेश; सरकारकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

PM Kisan Yojana: निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांसाठी खुशखबर; लवकरच खात्यात जमा होणार २००० रुपये

Tendli Sabzi Benefits : 'ही' १० रुपयांची भाजी अनेक आजारांवर गुणकारी; डायबिटीजपासून किडनीपर्यंत सर्व आजार छुमंतर

Tea Time: दिवसातून किती वेळा चहा- कॉफी प्यावी?

SCROLL FOR NEXT