Chronic Kidney Disease google
लाईफस्टाईल

Kidney: सावधान! कामात लक्ष लागत नाहीये? किडनीच्या बिघाडामुळे मेंदूवर होऊ शकतो परिणाम, तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

CKD Symptoms: नव्या संशोधनात किडनीचा आजार वाढल्यास मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे स्पष्ट झाले. लघवीत प्रोटीन वाढणे, उच्च रक्तदाब आणि सूज यामुळे स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो.

Sakshi Sunil Jadhav

सध्या लोक खूप फॅन्सी झाले आहेत. अनेकांना चांगली लाइफस्टाइल जगायला आवडतं. छान कपडे घालायला आवडतात, मोठ मोठ्या हॉटेल्समध्ये पार्टी, धमाल, मज्जा करायला आवडतं. लोक लांब-लांब फिरायला जातात. पण ही उत्तम लाइफस्टाइल आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. तर याचं उत्तर नाही असं आहे. कारण तुम्ही तुमची स्वप्न पुर्ण करताना स्वत: च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता. तासंतास स्क्रीनवर काम, मोबाईलचा अती वापर, कमी झोप, चुकीच्या वेळी अन् हेल्दी पदार्थांचे सेवन यासगळ्यामुळे तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या आणि जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

अनेकांना चुकीच्या आणि रोजच्या बदलेल्या सवयींमुळे किडनीच्या आजारांना सामोरं जावं लागतं. हा आजार एकदा सुरु झाला की याचा शेवट जवळपास मृत्यूनेच होतो. किडनीचा आजार (Chronic Kidney Disease - CKD) वाढत जातो तेव्हा आणखी एका आजाराला किंवा समस्येला सामोरं जावं लागू शकतं. ती म्हणजे, मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होणं. असा महत्त्वाचा निष्कर्ष एका नव्या अभ्यासातून समोर आला आहे. हा अभ्यास The Journal of the American Medical Association (JAMA) Network Open या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे किडनीचे रोजचे कार्य हळूहळू कमी होत जाणे. जवळपास तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ किडनी नीट काम करत नसेल तर हा आजार होतो. असं तज्ज्ञ सांगतात. या स्थितीत किडनी शरीरातली साठलेली घाण आणि विषारी पदार्थ नीट गाळू शकत नाही.

तज्ज्ञांच्या टीमने 21 ते 79 वयोगटातील 5,600 हून अधिक लोकांचा सहा वर्षे सर्व्हे किंवा अभ्यास केला. या काळात रुग्णांच्या रक्त आणि लघवीच्या चाचण्या करून किडनीचे कार्य तपासण्यात आलं. तसेच मेंदूच्या कार्याची चाचणी घेऊन लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता, विचार करण्याचा वेग आणि निर्णय घेण्याची क्षमता यांचा अभ्यास करण्यात आला.

अभ्यासात असे आढळले की ज्यांच्या लघवीत प्रोटीनचे प्रमाण जास्त होते (याला urinary protein to creatinine ratio म्हणतात), त्यांच्यामध्ये लक्ष केंद्रीत करण्यात अडचण, माहिती प्रक्रिया करण्याचा वेग कमी होणे आणि नियोजन व निर्णय क्षमता कमी होणे असे बदल दिसून आले. म्हणजेच किडनीच्या आजाराची तीव्रता वाढली की मेंदूच्या कार्यातही बिघाड होण्याचा धोका वाढतो.

संशोधकांच्या मते, किडनीचा आजार वाढल्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. उच्च रक्तदाबामुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि त्यामुळे स्मरणशक्ती व विचारशक्ती कमी होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच डिमेन्शियासारख्या आजारांचा धोका सर्वसामान्य लोकांपेक्षा जास्त असू शकतो. मात्र उच्च रक्तदाब हे एकमेव कारण नाही, असेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे. किडनीच्या आजाराशी संबंधित इतर समस्या जसे की शरीरातील खनिजांचे असंतुलन, दीर्घकालीन सूज (chronic inflammation), ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, झोपेचे विकार आणि अ‍ॅनिमिया यांचाही मेंदूच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला सुरवात

Raj Thackeray : राज ठाकरे-शिंदे भेटीवर संजय राऊत संतापले; म्हणाले, महाराष्ट्राच्या....

Car Accident: हे कसं शक्य आहे? हायवेवरच्या २० फूट उंच बोर्डात अडकली थार, व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले

Bhigwan Kidnapping Case: मध्यरा‍त्री 'ती' तरूणी पोलिस ठाण्यात हजर, म्हणाली झहीरसोबतच लग्न करणार...; भिगवणमध्ये नेमकं काय घडलं होतं?

Rinku Rajguru: नास्तिकतेपासून अध्यात्माकडे...; 'हा' अनुभव रिंकू राजगुरूसाठी ठरला टर्निंग पॉईंट

SCROLL FOR NEXT