यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी २६ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वत्र साजरी केली जाणार आहे. सध्या दहीहंडीची तयारी मुलं करताना पाहायला मिळत आहे. श्रीकृष्णाचे भक्त जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करतात. या दिवशी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. या दिवशी अनेक लोक उपवास करून पूजा करतात. याशिवाय कान्हाला आवडत्या वस्तू अर्पण करून नैवेद्य देखील दाखवतात. श्रीकृष्णाला आवडेल अशा नैवेद्याची रेसिपी जाणून घ्या.
श्रीकृष्ण जन्माष्टमीला नैवेद्य म्हणून केशर खीर दाखवा.
केशर खीर
साहित्य
दूध
साखर
तूप
वेलची पावडर
जायफळ पावडर
केशर
सुकामेवा
सुके खोबरे
कृती
केशर खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम केशर पाण्यात भिजवून ठेवा. आता एका पॅनमध्ये तूप घालून तांदूळ छान परतून घ्या. दुसरीकडे एका पॅनमध्ये दूध उकळायला ठेवा आणि त्यात भाजलेले तांदूळ घालून सतत ढवळत रहा. तांदूळ हळूहळू शिजायला लागले. मग त्यामध्ये केशर टाका. थोड्या वेळाने तांदूळ शिजेल आणि केशरचा रंग घेईल. भात शिजल्यावर त्यात साखर, वेलची पूड, जायफळ पावडर टाकून आणखी काही वेळ शिजवा. खीर सतत ढवळत रहा म्हणजे ती घट्ट होईल. ५ मिनिटांनी गॅस बंद करून त्यात बारीक केलेला सुकामेवा घाला. त्यानंतर यात किसलेलं सुकं खोबरं घाला. अशाप्रकारे झटपट केशर खीर तयार झाली. खीर फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. त्यानंतर बाळकृष्णाला नैवेद्य दाखवा आणि तुम्ही आस्वाद घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.