South Indian Food : ना डाळ, ना तांदूळ 'या' पदार्थाने झटपट बनवा साऊथ इंडियन फूड, नोट करा मेदू वड्याची रेसिपी

Medu Vada Recipe : सकाळच्या नाश्त्याला हलक्या फुलक्या मुरमुऱ्यांपासून मेदू वडा बनवा. हा पौष्टिक नाश्ता खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहील.
Medu Vada Recipe
South Indian FoodSAAM TV
Published On

मुरमुरे हा पचायला हलका असा पदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही नाश्त्याला सहज खाऊ शकता. मुरमुरे हा स्नॅक्सचा प्रकार आहे. सकाळच्या, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही यांच्यापासून स्वादिष्ट पदार्थ बनवू शकता.

आजकाल सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचे? हा प्रश्न पडतो. आपण सरास सकाळच्या नाश्त्याला साऊथ इंडियन पदार्थांचे सेवन करतो. पण हे पदार्थ करायला आदल्या रात्रीपासून तयारी करावी लागते. पण आता तुम्ही साऊथ इंडियन पदार्थ मुरमुऱ्यांपासून झटपट बनवू शकता. मुरमुऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदके, प्रथिन, कॅल्शियम असते. मुरमुऱ्यांचा मेदू वडा खाल्ल्याने पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहते. जाणून घ्या मुरमुऱ्यापासून बनवा मेदू वड्याची साधी-सोपी रेसिपी

मुरमुऱ्यापासून बनवा मेदू वडा

साहित्य

  • मुरमुरे

  • हिरवी मिरची

  • पोहे

  • कढीपत्ता

  • आलं

  • कोथिंबीर

  • जिरे

  • काळी मिरी

  • मीठ

  • दही

  • तेल

  • पाणी

Medu Vada Recipe
Children Health : हडकुळी मुलं होतील धष्टपुष्ट, रोज सकाळी खा 'हा' पौष्टीक लाडू

कृती

मुरमुऱ्याचा वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मुरमुरे टाकून त्यात पाणी घालून हलकेच भिजवून घ्या. थोड्या वेळाने पाणी काढून मुरमुरे हातांनी दाबून मॅश करा. यात बारीक चिरलेल्या हिरवी मिरची, कोथिंबीर, आल्याची पेस्ट, कढीपत्ता, जिरे, काळीमिरी पावडर, मीठ चवीनुसार, भिजवलेले पोहे आणि दही घालून सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्या. मिश्रण घट्टसर मळून झाल्यावर त्याचे मेंदू वड्याच्या आकारासारखे वडे तयार करा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून ते मंद आचेवर गोल्ड फ्राय तळून घ्या.

Medu Vada Recipe
Kartuli Bhaji : पावसाळ्यातला रानमेवा! करटूलीची भाजी घरच्याघरी कशी बनवाल? वाचा रेसिपी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com