Recipe: नाश्त्यासाठी बनवा 15 मिनिटांत टेस्टी आणि कुरकुरीत पोह्यांचे वडे; रेसिपी पाहा

Poha Vada Recipe : दररोज नाश्त्याला वेगवगळे पदार्थ काय बनवावे अशा प्रश्न गृहिणींना पडलेला असतो. रोज रोज पोहे, उपमा, शिरा खाऊन खूप कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही पोह्याचे वडे बनवू शकतात.
Poha Vada Recipe
Poha Vada RecipeSaam Tv
Published On

Poha Vada Recipe In Marathi:

दररोज नाश्त्याला वेगवगळे पदार्थ काय बनवावे अशा प्रश्न गृहिणींना पडलेला असतो. रोज रोज पोहे, उपमा, शिरा खाऊन खूप कंटाळा येतो. त्यामुळे कधीतरी काहीतरी वेगळं खायची इच्छा होते. त्यामुळे बनवायला सोपी अशी पोह्यांच्या वड्याची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आपण नेहमी मेदूवडा, बटाटावडा खातो. परंतु हे वडे बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. परंतु कधीतरी झटपट होणारा आणि चविष्ट असा पदार्थ बनवायचा असेल तर पोह्यांचे वडे नक्की बनवू शकता. पोह्याचे वडे चविष्ट आणि खुसखुशीत लागतो. त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. (Latest News)

साम्रगी

  • पोहे

  • तांदळाचे पीठ

  • कांदा

  • शिमला मिरची

  • गाजर

  • कोथिंबीर

  • मिरची

  • आले

  • लाल तिखट

  • धनेपूड

  • हळद

  • चाट मसाला

  • तेल

  • मीठ

Poha Vada Recipe
Gajar Chilly Pickle Recipe : घरच्या घरी बनवा झणझणीत गाजर-मिरची लोणचं, ४-५ महिने टिकेल; पाहा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम पोह्यात पाणी घाला. ते स्वच्छ धुवून घ्या. त्यात पुरेसे पाणी टाकून पाच मिनिटे भिजत ठेवा.

  • त्यानंतर पोह्यातील सर्व पाणी काढून घेऊन ते मॅश करुन घ्या. या पोह्यात तांदळाचे पीठ टाका.

  • बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची, किसलेला गाजर, कोथिंबीर, मिरची, किसलेले आले टाका.

  • या मिश्रणात लाल तिखट, धना पावडर, मीठ, हळद, चाट मसाला टाका. हे मिश्रण एकजीव करुन घ्या.

  • या मिश्रणाला मेदू वड्यासारखा आकार द्या. त्यानंतर गॅसवर कढईत तेल गरम करा. मंद आचेवर हे वडे तळून घ्या.

  • खमंग खुसखुशीत वडे तुम्ही पुदिण्याची चटणी किंवा सॉससोबत खाऊ शकतात.

Poha Vada Recipe
Sankasht Chaturthi 2024 : माघ महिन्यातील द्विजप्रिय संकष्ट चतुर्थीला करा उपाय, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com