Shraddha Thik
तळलेले पदार्थ खाणे आपल्यापैकी प्रत्येकालाच आवडते.
कधी पापड-कुरडई, भजी, वडे, सामोसा, पुऱ्या असे काही ना काही आपण तळलेले खात असतो. बाहेर खाण्यापेक्षा घरी खाणे चांगले म्हणून आपण हे पदार्थ घरी करतो.
मात्र तळलेले जास्त खाणे चांगले नाही आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढण्याची आणि हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
एखादा पदार्थ तळण्यासाठी आपण कढई किंवा तेल किती प्रमाणात तापवतो हे लक्षात घेणे गरजेचे असते.
चरबीयुक्त पदार्थ जास्त हिटवर तळू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की सगळेच चरबीयुक्त पदार्थ जास्त उष्णतेवर तळायला हवेत.
तेल गरम केल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रक्रिया होते. त्याच तेलात तळलेले पदार्थ आपण खाल्ल्यावर त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. त्यामुळे तेलाची निवड करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी.
तूप, खोबरेल तेल आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑईल हे तळण्यासाठी अतिशय उत्तम मानले जाणारे पदार्थ आहेत. याशिवाय सूर्यफूल, कॅनोला, सोयाबिन आणि इतर सर्व तेलांचे तळताना ऑक्सिडायजेशन होते आणि त्यातील हानिकारक रसायने आरोग्यासाठी घातक ठरतात.