Karva Chauth 2025 saam tv
लाईफस्टाईल

Karva Chauth 2025: यंदाच्या करवा चौथला बनतोय अशुभ योग; 'या' वेळी विवाहित महिलांनी पुजा करणं टाळाच

Vyatipat Yoga on Karwa Chauth: हिंदू धर्मात सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खडतर मानला जाणारा करवा चौथचा उपवास यंदा १० ऑक्टोबर २०२५ रोजी आहे. अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवल्या जाणाऱ्या या व्रताला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कार्तिक महिन्यातील चतुर्थीला साजरा केला जाणारा करवा चौथ व्रत यंदा विशेष योग घेऊन येत आहे. या वर्षी व्रताच्या दिवशी सिद्धी योग आणि व्यातिपात योग निर्माण होणार आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, माता पार्वती यांनी भगवान शंकरांसाठी आणि द्रौपदीने पांडवांसाठी हे व्रत केलं होतं. या व्रताच्या प्रभावामुळे विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभतं. कठीण प्रसंगांमध्येही करवा माता पतीचं रक्षण करतात आणि वैवाहिक जीवनात आनंद आणि समृद्धी आणतात.

तज्ज्ञ पं. वेदमूर्ती शास्त्री यांच्या मते, विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि वैवाहिक सुखासाठी करतात. करवा चौथचं व्रत सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत केलं जातं. रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतरच पाणी प्यायलं जातं.

करवा चौथ व्रताची पद्धत

करवा चौथच्या दिवशी विवाहित स्त्रिया पहाटे सूर्योदयापूर्वी विशेष आहार ग्रहण करतात. त्यानंतर दिवसभर निर्जळी उपवास ठेवतात, म्हणजेच पाणी सुद्धा घेत नाहीत. संध्याकाळी त्या गणेशजी, चौथ माता आणि करवा माता यांची पूजाअर्चा करतात. रात्री चंद्र उगवल्यानंतर त्या चलनीतून चंद्राचे दर्शन घेतात आणि अर्घ्य अर्पण करतात. त्यानंतर पतीच्या हातून पाणी ग्रहण करून उपवास सोडतात.

कोणत्या योगात करवा चौथची पूजा टाळावी

यंदाच्या करवा चौथला सिद्धी योगाचा शुभ संयोग लाभणार आहे, ज्यामुळे व्रताचा प्रभाव विशेष वाढतो. परंतु त्यानंतर व्यातिपात योग लागतो, जो अशुभ मानला जातो. या योगाच्या नकारात्मक प्रभावापासून वाचण्यासाठी 10 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 5:42 वाजण्यापूर्वी संपूर्ण पूजनविधी पूर्ण करावी. चंद्रोदयाच्या वेळी फक्त चंद्रपूजन आणि जलग्रहणाचा विधी शिल्लक ठेवावा.

करवा चौथची तिथी आणि वेळ

काशीतील मान्य पंचांगांनुसार ऋषिकेश आणि महावीर पंचांगानुसार कार्तिक कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 9 ऑक्टोबरच्या रात्री 10:55 वाजता सुरू होणार आहे आणि 10 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 7:39 वाजेपर्यंत राहील.

या दिवशी चंद्रोदय रात्री 8:03 वाजता होईल. कृत्तिका नक्षत्र 9 ऑक्टोबर रात्री 8:03 पासून 10 ऑक्टोबर संध्याकाळी 5:32 वाजेपर्यंत राहील. त्यानंतर रोहिणी नक्षत्र लागेल, जे 11 ऑक्टोबर दुपारी 3:27 वाजेपर्यंत राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपचा शरद पवार आणि काँग्रेसला दणका; आमदाराच्या मुलासह बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Amboli Tourism : 'आंबोली'ला गेल्यावर काय काय पाहाल? पटकन नोट करा सुंदर ठिकाणांची नावे

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणीला दिवाळीचा हप्ता कधी येणार?

Wednesday Horoscope : व्यवसायात नवीन भागीदारी टाळा; बँकतील नोकरदारांसाठी तणावाचा दिवस, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Crime News : डिलिव्हरी बॉक्स अन् बनावट बारकोड; कंपन्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्यांचं हरियाणा कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT