Gauri Puja 2024  Saam TV
लाईफस्टाईल

Gauri Puja 2024 : गौरीचे आवाहन आणि विसर्जन करण्यासाठी मुहूर्त काय? वाचा सविस्तर

Jyeshtha Gauri Avahana Muhurat : जेष्ठा गौरी आवाहन आणि विसर्जन कधी आहे? त्याचा मुहूर्त काय? याची माहिती या बातमीमधून तुम्ही जाणून घेऊ शकता.

Ruchika Jadhav

या वर्षी १० सप्टेंबरला जेष्ठा गौरी पुजन आहे. त्यामुळे घरात गौराईच्या आगमानाची लगबग सुरू आहे. एकीकडे काहींच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. तर दुसरीकडे घरोघरी गौराई येत आहेत. आज गौराई पुजन आणि आवाहनाचा शुभ मुहूर्त काय आहे? याची माहिती जाणून घेणार आहोत.

गौराई आवान शुभ मुहूर्त

भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचे आवाहन होत असते. यंदा रात्री ८ वाजून २ मिनिटांपर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्रामध्ये राहणार आहे. म्हणून आज रात्री ८.०२ पर्यंत ज्येष्ठा गौरी आगमनाचा शुभ मुहूर्त आहे. तसेच १२ सप्टेंबर गुरुवारी रात्री ९.५१ पर्यंत मूळ नक्षत्रावर गौरींच्या विसर्जनाचा मुहूर्त आहे.

गौराई घरी कधीच एकटी येत नाही. दोघी बहिणी एकत्र घरी येतात. गौरी म्हणजे गणपतीची आई आणि माता पार्वती, तसेच लक्ष्मी देवीची मोठी बहीण मानली जाते. त्यामुळे एकीला ज्येष्ठा आणि दुसरीला कनिष्ठा असं म्हटलं जातं.

३ दिवस आधीच गणपती बाप्पा आपल्या घरी विराजमान झाला आहे. त्यामुळे गौराई जणू काही गणरायाचा पाहुणचार व्यवस्थित होत आहे की नाही हे पाण्यासाठीच आली आहे असे वाटते. गौरी घरोघरी सप्तमीला येते. त्यानंतर अष्टमीला ती निघून जाते. तसेच नवमीला पुन्हा आपल्या घरी परतते.

गौराईला सुद्धा माहेरचे सुख मिळाले म्हणून घरोघरी तिचा पाहुणचार केला जातो. या दिवसांत गौरीला विविध सुंदर साड्या आणि दागिण्यांनी सजवले जाते. गौरीला खाण्यात जे काही आवडते ते सर्व पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवले जातात. गौरीचा पाहुणचार करताना तिला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते. ज्या घरात गौरी तृप्त होते, तेथे संपूर्ण वर्षभर भरभराट राहते असं म्हटलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT