Viral Video: आली गौराई अंगणी.. भाजी विकणाऱ्या जुळ्या बहिणींना गौरी सारखं सजवलं; व्हिडिओ पाहून विश्वास बसेना!

Twin Sisters Makover As Gaurai Look: व्हिडिओच्या शेवटी गौराईच्या रुपातील या जुळ्या बहिणींना पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही..!!!
Ganapati Festival Viral Video:
Ganapati Festival Viral Video:Saamtv
Published On

Beautiful Gauri Makeup Viral Video:

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. घरोघरी गणपती बाप्पाचे थाटात आगमन झाले. गणरायापाठोपाठ गौराईसुद्धा आल्या. सोशल मीडियावर सुंदर, मनमोहक बाप्पा- आणि गौराईंचे फोटो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून चक्क भाजी विक्री करणाऱ्या दोघा बहिणींना गौराई सारखे सजवल्याचे यामध्ये दिसत आहे.

Ganapati Festival Viral Video:
Devendra Fadnavis Video: देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दौरा; त्या व्हिडीओमुळे सत्ताधारी-विरोधकांमुळे जुंपली

याबाबत अधिक माहिती अशी की, गौरी गणपतीच्या सणाची सर्वत्र धामधुम सुरू आहे. गौराईची सजावट करणे हा गृहिणींचा सर्वात आवडता क्षण.. पेपर वाचणाऱ्या गौराई, वेगवेगळ्या स्टाईलमधील, पेहरावातील गौराईंची आकर्षक सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर येत आहेत. अशाच दोन सुंदर गौराईंचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

प्राजक्ता चव्हाण या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी भाजी विकणाऱ्या दोन जुळ्या बहिणींचा गौराईच्या रुपात मेकओव्हर केल्याचे त्यांनी सांगितले. हा मेकअप इतका सुंदर आणि मनमोहक दिसत आहे की पाहणारा प्रत्येक जण त्यांचे कौतुक करत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन जुळ्या बहिणी बाजारात भाजी विकताना दिसत आहेत. त्यांना स्टुडिओमध्ये आणून त्यांचा अगदी हुबेहुब गौराईच्या रुपातील मेकअप केला. व्हिडिओच्या शेवटी गौराईच्या रुपातील या जुळ्या बहिणींना पाहून कोणाचाही विश्वास बसणार नाही, इतक्या त्या सुंदर, आकर्षक दिसत आहेत. (Latest Marathi News)

या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी प्राजक्ता चव्हाण यांच्या या कलेला भरभरुन दाद दिली आहे. तर काही जणांनी त्या जुळ्या बहिणी किती कष्टाळू आहेत, असे म्हणत त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

दरम्यान, प्राजक्ता चव्हाण या मेकअप आर्टिस्ट असल्याचे त्यांच्या अकांउटवरुन दिसत आहे. त्यांच्या पोस्टमध्ये अनेक सुंदर मेकअपचे व्हिडिओ पाहायला मिळत असून त्यावर नेटकऱ्यांनीही भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Viral Video News In Marathi)

Ganapati Festival Viral Video:
Ganeshotsav 2023: कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासातही विघ्न; ट्रेनसह बसमध्ये प्रवाशांची झुंबड, नागरिकांचे हाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com