
गणेशोत्सवासाठी अनेक भाविक आपल्या गावी जातात. गणरायाचे आगमन होताच कोकणकरांची पाऊले गावी वळू लागतात. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. आज गणेशोत्सवाचा ७वा दिवस आहे. दिड, पाच आणि सात दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करून कोकणातून अनेक जण मुंबईत परतत आहेत. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय. (Latest Marathi News)
रत्नागिरी - कोकण रेल्वेत प्रवाशांची गर्दी
रत्नागिरी - कोकण रेल्वेमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नागरिक मोठ्या संख्येने मुंबईत परतत आहेत. त्यामुळे आज सकाळी रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.गणपतीसाठी आलेले चाकरमानी परतीच्या मार्गावर असतानाच कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक कोलमडलंय.
लोकल उशिराने
कोकण - रत्नागिरीतून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेन 30 ते 40 मिनिटे उशिराने धावताहेत. ट्रेनला उशिर होत असल्याने स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी उफाळून येत आहे. यामध्ये लहान मुलांचे अतोनात हाल होतायत. ट्रेनमध्ये पाय ठेवण्यासाठीही जागा नसल्याची परिस्थिती निर्माण झालीये.
बसमध्येही तुडूंब गर्दी
विविध जिल्ह्यातून बसेस गणेशोत्सवासाठी मुंबई आणि कोकणात गेल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक बस फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवासाठी नंदुरबार जिल्ह्यातील चारही आगारातून बसेस मुंबई आणि कोकणात पाठवण्यात आल्यात. त्याचा परिणाम जिल्ह्यातील बस सेवेवर होत असून प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसत आहे.
वाढत्या गर्दीचा फटका रोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना देखील सहन करावा लागतोय. कारण गणेशोत्सवात कोकणात आणि विविध जिल्ह्यांमध्ये गेगेल्या नागरिकांसाठी अनेक बस फिरवण्यात आल्यात. त्यामुळे रोजची बससेवा विस्कळीत झालीये.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.