dahi handi safety tips saam tv
लाईफस्टाईल

Dahi Handi : दहीहंडी फोडणार आहात? मग अपघात टाळण्यासाठी या १० गोष्टी लक्षात ठेवा

Janmashtami : दहीहंडी सणाचा आनंद घेताना सुरक्षेच्या टिप्स जाणून घ्या. पिरॅमिड सराव, कपडे, हवामान, आहार आणि आयोजकांची जबाबदारी संपूर्ण माहिती नक्की वाचा आणि जन्माष्टमी आनंदात साजरी करा.

Sakshi Sunil Jadhav

दहीहंडी हा सण सगळ्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. यामध्ये लहान मुलं, मुली, तरुण मुलं मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. दहीहंडी हा सण उत्साह, जोश आणि एकतेचा सण असला, तरी हंडी फोडण्याच्या स्पर्धेत अनेकदा अपघात होतातच. हंडी फोडताना अनेक जणांना काही सुरक्षेच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या पुढील प्रमाणे आहेत.

१. हंडी फोडण्याचा सराव

हंडी फोडण्यापूर्वी भरपूर सराव करणे गरजेचे आहे. पिरॅमिड तयार करण्याची तंत्रे, वजन संतुलन, पायांची पकड आणि एकमेकांशी समन्वय याचा पूर्वतयारीत सराव केल्यास अपघात होण्याची शक्यता कमी होते.

२. हंडी फोडताना कोणते कपडे परिधान करावेत?

गोविंदा पथकातील सदस्यांनी साधे, वजनाला हलके, घट्ट कपडे आणि रबरी सोल असलेले ग्रिप शूज परिधान करावीत. डोक्यावर हेल्मेट आणि गरज असल्यास नी-कॅप्स वापरावेत. हे उपकरण पडल्यास दुखापत कमी करतात.

३. हंडीच्या थरांची योग्य रचना

खालच्या थरातील सदस्य मजबूत, उंच व वजनाने जड असावेत, तर वरच्या थरातील सदस्य हलके आणि चपळ असावेत. पाय व हात योग्य ठिकाणी ठेवूनच पुढील हालचाल करावी.

४. हवामान आणि वातावरणाची काळजी

पावसात जमिन घसरट होते. अशावेळी रबर मॅट्स किंवा प्लास्टिक शीट्सचा वापर करावा.

५. आहाराची वेळ

रिकाम्या पोटी हंडी फोडण्यास जाऊ नका. हलका आहार, पुरेसे पाणी पित राहा. जर तुम्हाला थकवा जाणवला तर लगेच पिरॅमिडमधून बाहेर पडा.

६. आयोजकांची जबाबदारी

स्पर्धा आयोजित करणाऱ्यांनी उंची मर्यादित ठेवावी, पुरेशी सुरक्षा व्यवस्था, फर्स्ट एड टीम आणि अँब्युलन्स सज्ज ठेवावी.

७. मानसिक तयारी

स्पर्धेदरम्यान शांत राहणे, एकमेकांवर विश्वास ठेवणे आणि गडबडीत चुकीचा निर्णय न घेणे महत्त्वाचे आहे. लहान वयाच्या गोविंदांना फक्त खालच्या थरांमध्ये ठेवावे. उंच थरांमध्ये केवळ अनुभवी आणि सवय असलेले सदस्यच जावेत. दहीहंडीचा आनंद घेताना स्वतःची आणि सहकाऱ्यांची सुरक्षा घेणे महत्वाचे आहे. थोडी काळजी घेतल्यास हा सण जखमेशिवाय, हसत-खेळत आणि संस्मरणीय पद्धतीने साजरा करता येतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT