Janani Suraksha Yojana Saam Tv
लाईफस्टाईल

Janani Suraksha Yojana : महिलांसाठी सरकाराची आर्थिक मदत; जाणून घ्या, केंद्र सरकारच्या 'या' योजनेबाबत

गरीब गर्भवती महिलांमध्ये सुरक्षित प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.

कोमल दामुद्रे

Janani Suraksha Yojana : केंद्र सरकार गर्भवती महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी अनेक योजना राबवत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जननी सुरक्षा योजना सुरक्षित मातृत्व कार्यक्रम म्हणून चालवली जात आहे. या योजनेंतर्गत गरीब आणि दुर्बल आर्थिक वर्गातील महिलांना सरकार 3400 रुपयांची आर्थिक मदत देते.

गरीब गर्भवती महिलांमध्ये सुरक्षित प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. यामध्ये केंद्र सरकार गरोदर महिलांना आर्थिक मदत करते. दारिद्र्यरेषेखालील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. (Latest Marathi News)

'या' योजनेचा लाभ कोणाला मिळतो ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांची (Women) प्रसूती शासकीय रुग्णालयात किंवा मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयात होणे आवश्यक आहे. सरकारने दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते. त्यामुळे गरोदर महिलांचे बँक खाते असणे बंधनकारक असून बँक खातेही आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.

जर तुम्ही दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला 1,400 रुपयांची आर्थिक मदत मिळेल. यासह, आशा सहयोगींसाठी आणि अतिरिक्त सेवेसाठी 300 रुपये दिले जातात. एकूणच ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना दोन हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. दुसरीकडे, शहरी भागात राहणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी एकूण 1,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. यासोबतच अशा सहकार्‍याला 200 रुपये फी आणि अतिरिक्त मदतीसाठी 200 रुपये दिले जातात.

अर्ज कसा कराल?

या योजनेचा लाभ फक्त 2 मुलांसाठी (Child) उपलब्ध आहे. आईचे वय किमान 19 वर्षे असावे. स्त्री दारिद्र्यरेषेखालील असावी. अर्जासाठी, तुम्ही तिच्या अधिकृत वेबसाइट https://pmmodiyojana.in/wp-content/uploads/2020/03/jsy_guidelines_2006.pdf ला भेट देऊन फॉर्म भरा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT