PM Kisan Scheme: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना खूशखबर! लवकरच केंद्र सरकार खात्यावर पैसे ट्रान्सफर करणार, तुमचं नाव कसं तपासणार?

पीएम मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात 16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता ट्रान्सफर करतील
farmer
farmerSaamTV
Published On

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दिवाळीपूर्वी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना (Farmer) मोठी भेट देणार आहेत. जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या बाराव्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर उद्या म्हणजेच सोमवारी तुमच्या खात्यात 2000 रुपये येऊ शकतात. त्यामुळे तुमचं नाव या यादीत आहे की नाही हे तुम्ही लगेच तपासून पाहा.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी राजधानी पुसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत पंतप्रधान किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन करतील. यावेळी पीएम मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात 16,000 कोटी रुपयांचा 12 वा हप्ता ट्रान्सफर करतील

farmer
Pune Accidnet : पुण्यात चांदणी चौक परिसरात भीषण अपघात, शिवशाही बसची ६-७ वाहनांना जोरदार धडक

कृषी मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पीएम किसान सन्मान संमेलनात पंतप्रधान मोदी शेतकरी आणि कृषी स्टार्टअप्सना पुढे नेतील. यासोबतच ते शेतकऱ्यांचे उत्पन्न पुढे नेण्यासाठी प्रोत्साहित करतील. (Latest Marathi News)

पीएम किसानच्या यादीत तुमचे नाव कसं तपासाल

>> पीएम किसानच्या https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटवर जा.

>>होम पेजवर मेन्यूमध्ये Farmers Corner वर क्लिक करा.

>> आता Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.

>> एक नवीन पेज उघडेल, आता तुम्हाला राज्यातील ड्रॉप-डाउन मेनूमधून तुमचे राज्य निवडावे लागेल.

>> यानंतर दुसऱ्या टॅबमध्ये जिल्हा, तिसऱ्यामध्ये तहसील किंवा उपजिल्हा, चौथ्यामध्ये ब्लॉक आणि पाचव्या क्रमांकावर आपले गाव निवडा.

>> आता तुम्हाला Get Report वर क्लिक करावे लागेल. यानंतर संपूर्ण यादी तुमच्यासमोर उघडेल.

farmer
...त्यामुळे भाजपनेच मनसेला पत्र पाठवायला सांगितलं असावं; अरविंद सावंतांचा गंभीर आरोप

मे महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने अकराव्या हप्त्यापैकी 21,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना जाहीर केले होते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान, तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान दिला जातो. त्याच वेळी, तिसऱ्या हप्त्याचे पैसे 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात.

पीएम किसान योजनेंतर्गत सरकार देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. यामध्ये 2000-2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com