tea 
लाईफस्टाईल

जागतिक चहा दिन..टपरीवरचा कटींग ते अमृततुल्‍यचा कप; चहाची मजाच न्‍यारी

जागतिक चहा दिन..टपरीवरचा कटींग ते अमृततुल्‍यचा कप; चहाची मजाच न्‍यारी

Rajesh Sonwane

जळगाव : गरमागरम आणि स्वादिष्ट ज्‍या पेयाने दिवसाची सुरुवात होते ती म्‍हणजे चहा. मग हिवाळा, पावसाळा असो की उन्हाळा या तीनही ऋतूंमध्ये गरम चहाचा कप ओठांना लावून सुरका मारणारे ‘चहा’त्‍यांना नक्‍कीच आवडते. या चहाचा प्रवास घरातील गुळाची चहा म्‍हणा की टपरीवरील कटींगपासून शॉपरूपी झालेल्‍या अमृततुल्‍य कपापर्यंत; त्‍या चहाची वेगवेगळ्या चवीची मजाच न्‍यारी. (jalgaon-news-World-Tea-Day-cup-of-nectar-to-cut-on-the-tapri)

आज जागतिक चहा दिन यानिमित्‍ताने सकाळचे पेय म्‍हणून अमृत मानल्‍या जाणाऱ्या या चहाबद्दल जाणून घेवूयात. सध्‍या थंडीचे दिवस सुरू आहेत. या गुलाबी थंडीत चहा प्यायची मजा काही वेगळीच. थंडी आणि चहा हा जणू काही दुग्धशर्करा योग म्‍हणावा लागेल. सकाळ आणि दुपारचा चहा न चुकता घेतलाच जातो. चाकरमानी तर टपरीवर चहा प्यायला येवून उभा राहतोच. अर्थात चहाचा एक प्याला घेतला की मूड फ्रेश होतो. पाच दशकांपुर्वी चहा हा जास्‍तकरून हॉटेल्‍समध्‍ये मिळत असे. परंतु, कालांतराने चहा रस्‍त्‍यावर आला. गिरणी व कारखान्‍यांच्‍या गेटच्‍याजवळ आण्णा, आप्‍पा चहावाला दिसू लागला. अगदी पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत गरम चहा देणारे विक्रेते कामगारांसाठी मोठे आधार होते. कोळशाची जळणारी शेगळीवर केली जाणारी चहाची चव ही वेगळीच होती.

शौकिनांचे म्‍हणणे मूड फ्रेश होवून येते तरतरी..

शरीराला हानिकारक असला तरी चहा तसा अनेकांच्या आवडीचे पेय. पाण्यानंतर भारतात सर्वाधिक पिले जाणारे पेय मानले जाते. चहा हा आळस घालवून मूड फ्रेश करतो, आणि तरतरी येते असे चहा पिणाऱ्या शौकिनांचे म्‍हणणे आहे. त्यामुळे कंटाळा आला की, निघाले चहा प्यायला. मग काय कटिंग स्पेशल चहा मारता मारता चर्चा रंगू लागते.

उभे राहिले अमृततुल्‍य

गाडीवर मिळणारा कटिंग ते सीसीडीमध्ये मिळणारा हाफ टी अशी चहाची कितीतरी रूपं. पण चहाची टपरी चालविणारा म्‍हटले की जरा कमी आणि गरीबीतला मनुष्‍यासाठी उत्‍पन्नाचे साधन मानले जाते. पण आज ही संकल्‍पना बदलली आहे. पुण्यातून चहाची अमृततुल्य कल्पकता उदयास आली आणि ती महाराष्‍ट्रातील जवळपास सर्वच शहरामध्ये पसरली आहे. पुण्यातल्या या अमृततुल्य चहाची चव चाखायला अगदी मोठे प्रशस्‍त शॉप घेवून त्‍यात प्रमुख एसी, फ्रिजसाठीची गुंतवणूक करून विविध शहरांमध्ये शाखा सुरू केल्‍या. म्‍हणून पुणेरी अमृततुल्‍य असे नाव देवून कटींग नव्हे तर अगदी मोठा कप भरूनच तेथे चहा पिण्याचा आनंद घेतला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IRCTC वेबसाइटवरून तिकीट बूक होईना? मग 'हे' अ‍ॅप्स घडवतील प्रवास

VIDEO : मविआ ही कोविडच्या काळात मलिदा खाणारी गॅंग; फडणवीस यांची घणाघाती टीका | Marathi News

Maharashtra News Live Updates: भाजप उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा

Chhagan bhujbal : ऐन विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पुन्हा जुंपली

Manoj Jarange News : आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा; जरांगेंचा नाव न घेता भुजबळांवर फटकेबाजी

SCROLL FOR NEXT