समोसा, जिलेबीसारख्या पदार्थांवर वॉर्निंग लेबल लावण्याबाबत फिरणाऱ्या बातम्यांचं PIB ने खंडन केलं आहे.
आरोग्य मंत्रालयाने आरोग्य जागरूकतेसाठी सार्वजनिक व कार्यालयीन ठिकाणी बोर्ड लावण्याचा सल्ला दिला आहे.
सल्ल्याचा उद्देश स्ट्रीट फूडवर बंदी घालणे नसून, लोकांनी आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात हा आहे.
काही दिवसांपासून समोसा आणि जिलेबी यांच्या कॅलरीजची माहिती देणारं लेबल लावलं जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने अशा बातम्यांचं खंडन केलं. PIB ने स्पष्ट केलं की अशा बातम्या चुकीच्या, दिशाभूल करणाऱ्या आणि निराधार आहेत. मंत्रालयाने दिलेले सल्ला हे कुठल्याही विशिष्ट पदार्थावर बंदी घालण्यासाठी नव्हते, तर आरोग्यदायी सवयींकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी होते.
PIB च्या अधिकृत स्पष्टीकरणात नमूद करण्यात आलं आहे की, आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच एक सल्ला जारी केलीये. या सल्ल्यानुसार, कॅफेटेरिया, कँटीन, मीटिंग रूम्स यांसारख्या सार्वजनिक आणि कार्यालयीन जागांमध्ये काही बोर्ड लावण्याची सूचना करण्यात आली आहे. या फलकांमध्ये असं सांगायचंय की, काही पदार्थांमध्ये hidden fats आणि अतिसाखर असते, जी आपल्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.
हे फक्त एक जागरूकतेसाठी प्रोत्साहन देणारा सल्ला आहे. म्हणजेच लोकांनी काय खावं, किती खावं याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा एवढाच हेतू आहे. सरकारच्या या सल्ल्यामध्ये कुठेही असं म्हटलं नाही की, स्ट्रीट फूड बंद करावं किंवा त्यावर वॉर्निंग लावा. तसंच भारतीय खाद्यसंस्कृतीला लक्ष्य करण्यात आलं आहे, असा दावा चुकीचा आहे.
फळं, भाज्या, लो-फॅट पदार्थ खाण्यावर भर द्यावा
पायऱ्यांचा वापर करणं, चालणं यासारखी शारीरिक हालचाल वाढवावी
ऑफिसमध्ये थोडा वेळ काढून छोटे व्यायामाचे ब्रेक घ्यावेत
फळं आणि पौष्टिक पर्याय उपलब्ध असावेत
ही संपूर्ण सूचना National Programme for Prevention and Control of Non-Communicable Diseases (NP-NCD) या राष्ट्रीय उपक्रमाचा भाग आहे. या मोहिमेचा उद्देश आहे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यांसारखे वाढत चाललेले आजार टाळण्यासाठी लोकांना योग्य सवयी स्वतःला लावल्या आहेत.
२०५० पर्यंत सुमारे ४४.९ कोटी भारतीय लठ्ठ किंवा ओव्हरवेट असतील, असा अंदाज आहे
हे प्रमाण पाहता, भारत अमेरिकेनंतर लठ्ठपणामुळे सर्वाधिक प्रभावित देश ठरेल
आत्ताच, शहरी भागातील प्रत्येक ५ पैकी १ प्रौढ जास्त वजनाचा आहे
लहान मुलांमध्येही लठ्ठपणा झपाट्याने वाढतोय. यामागचं कारण आहे ते म्हणजे चुकीचा आहार आणि कमी शारीरिक हालचाल
प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता म्हणतात, “जर एखाद्या व्यक्तीला हे माहित असेल की एका गुलाबजामुनमध्ये जवळपास ५ चमचे साखर असते तर तो कदाचित दुसरा खाण्यापूर्वी थोडा विचार करेल. हे अन्नावर बंदी घालणं नाही, तर लोकांनी विचारपूर्वक खाणं निवडावं, यासाठीचा प्रयत्न आहे.
समोसा आणि जिलेबीवर वॉर्निंग लेबल लावलं जाणार आहे का?
PIB ने स्पष्ट केलं आहे की अशा प्रकारच्या बातम्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाचा खरा उद्देश काय होता?
लोकांनी आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात व माहितीच्या आधारे निर्णय घ्यावेत, हा उद्देश होता.
सरकारने कोणत्या सवयींवर भर दिला आहे?
फळं-भाज्या खाणं, कमी तेल-साखर वापरणं, चालणं, व्यायामाचे ब्रेक घेणं यावर भर आहे.
ही मोहीम कोणत्या राष्ट्रीय उपक्रमाचा भाग आहे?
ही मोहीम NP-NCD (Non-Communicable Diseases) आणि Fit India Movement चा भाग आहे.
लठ्ठपणाबाबत सध्या भारताची स्थिती काय आहे?
२०५० पर्यंत ४४.९ कोटी भारतीय लठ्ठ असतील असा अंदाज आहे, आणि ही समस्या लहान मुलांमध्येही वाढतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.