Manasvi Choudhary
रोझमेरी ही एक औषधी वनस्पती आहे जिचा उपयोग केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. रोझमेरी तेलाने केसांचा मालिश केल्याने केसांची निरोगी वाढ होते.
तुम्ही केस धुताना शॅम्पूमध्ये रोझमेरी तेल मिक्स करून केसांना लावा यामुळे फायदा होईल.
केस धुताना रोझमेरी तेल पाण्यात मिक्स करा आणि केस धुवा.
रोझमेरी तेल आणि कोरफड जेल एकत्र करून केसांच्या टाळूला लावल्याने टाळूचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
रोझमेरी तेल हे डायहाइड्रोटेस्टोस्टेरोन नावाच्या हार्मोनच्या उत्पादनास प्रतिबंध करू शकते, ज्यामुळे केस गळत नाही.
रोझमेरीमध्ये नैसर्गिकरित्या अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो.
हे अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करतात, जे केसांच्या अकाली पांढरे होण्यास कारणीभूत असू शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.