Fatty Liver Risk Factor saam tv
लाईफस्टाईल

Fatty Liver: धक्कादायक! IT मध्ये काम करणाऱ्या 80% लोकांचं लिव्हर खराब; 'ही' लक्षणं दिसल्यास इग्नोर नका करू!

Fatty Liver Risk Factor: आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी, त्यांना अनेक आरोग्य समस्या भेडसावत आहेत. तासनतास संगणकाच्या समोर बसणे, अस्वस्थ जीवनशैली, अपुरी झोप आणि मानसिक ताण यामुळे लिव्हरच्या समस्या वाढत आहेत

Surabhi Jayashree Jagdish

इंजिनीयर म्हटलं की तो आयटी कंपनीमध्ये काम करतो, असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. जर तुम्हीही आयटी कंपनीमध्ये काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या आयटी कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढतेय. मात्र चिंतेची बाब म्हणजे जास्त कामाचे तास, अधिक वेळ बसून राहणं, अयोग्य आहार आणि ताणतणाव यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मेटाबॉलिक डिसफंक्शन-असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसीज (MAFLD) होण्याची शक्यता असते.

हैदराबाद विद्यापीठ आणि एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी (AIG) यांनी नुकतंच एक संशोधन केलं आहे. या संशोधनात असं आढळून आलं की, सुमारे 84% आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना फॅटी लिव्हरचा त्रास असल्याचं समोर आलं आहे. ज्यावेळी लिव्हरमध्ये जास्त चरबी जमा होते तेव्हा फॅटी लिव्हर होतो. अशा परिस्थितीत, जर त्यावर उपचार केले नाहीत तर ते सिरोसिस, यकृत निकामी होणं किंवा अगदी यकृताच्या कॅन्सरसारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात.

काय आहे फॅटी लिव्हरची लक्षणं?

  • सामान्य हालचाली करून थकवा जाणवणं

  • ओटीपोटात जडपणा येणं

  • आहार किंवा हालचालींमध्ये कोणताही बदल न करता वजन वाढणं

  • सतत तहान लागणं

  • वारंवार लघवी होणे

  • रक्तातील यकृत एंजाइम (ALT आणि AST) चा स्तर वाढणं

लिव्हरला निरोगी राखण्यासाठी काही उपाय

रिकाम्या पोटी ब्लॅक किंवा लिंबू पाणी पिणं

काळी कॉफी यकृतासाठी फायदेशीर ठरू शकते. हे लिव्हरमधील चरबी कमी करण्यास मदत करते. याशिवाय, एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्या. हे शरीरातील टॉक्सिक पदार्थ काढून टाकण्यास मदत करून पचन सुधारत.

20-20-20 नियम

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना बराच वेळ बसून राहावं लागतं. मात्र ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. अशा परिस्थितीत, दर २० मिनिटांनी २० सेकंद उभे राहा आणि २० फूट दूर पहा. यामुळे डोळ्यांचा थकवा कमी होतो आणि रक्ताभिसरण देखील सुधारतं.

जेवणानंतर पायी चाला

जेवणानंतर १० मिनिटं चालणं तुमच्या लिव्हरसाठी खूप फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास, पचन सुधारण्यास आणि लिव्हरमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT