Dangerous Heavy Metals in Toothpaste saam tv
लाईफस्टाईल

Toothpaste News : तुमच्या टूथपेस्टमध्ये विष आहे का? नव्या रिसर्चमधून धक्कादायक बाब समोर

Dangerous Heavy Metals in Toothpaste: तुमच्या टूथपेस्टमध्ये विष किंवा हाडांची पावडर आहे का? टूथपेस्टम असल्याचा दावा काही वेळा समोर आलेला आहे. तथापि, या दाव्यांची वैज्ञानिक पडताळणी महत्त्वाची आहे

Surabhi Jayashree Jagdish

आपके टूथपेस्ट मे नमक है क्या? ही जाहिरात तुम्ही पाहिली असेल. मात्र टूथपेस्टमधील मीठाबाबत तर माहिती नाही पण त्यामध्ये विष असण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार, जगभरातील लोकप्रिय टूथपेस्ट ब्रँडबाबत अनेक मोठे खुलासे झाले आहेत.

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, Lead Safe Mama नावाच्या संस्थेने केलेल्या थर्ड पार्टी लॅब टेस्टमधून असं समोर आलंय की, 51 टूथपेस्ट ब्रँड्सची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये ९० टक्के लेड (शिसं) आणि ६५ टक्के आर्सेनिकसारखे धोकादायक धातू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

लहान मुलांसाठी धोकादायक टूथपेस्ट

रिसर्चमधून हे देखील समोर आलं आहे की, ज्या टूथपेस्ट आणि टूथ पावडर ब्रँड्सची तपासणी केली गेली, ज्यांच्यामध्ये अशाही उत्पादनांचा समावेश होता जी लहान मुलांसाठी बनवण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे, या उत्पादनांपैकी ४७% उत्पादनांमध्ये मर्क्युरी (पारा) आणि ३५% उत्पादनांमध्ये कॅडमियम होतं.

लीड सेफ मामाचे संस्थापक ताम्रा रुबिन यांनी २०२५ मध्ये याला धक्कादायक म्हटलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार,आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे कोणीही ही धमकी गांभीर्याने घेतली नाही.

आरोग्यावर पडू शकतो दीर्घ परिणाम

संशोधनातून जे धातू टूथपेस्टमध्ये असल्याचं समोर आलं आहे ते वॉशिंग्टन राज्याच्या मानकांविरुद्ध आहेत. दरम्यान हे अमेरिकन संघीय नियमांचे उल्लंघन करत नाही. मात्र तज्ञांचं असं मत आहे की, शिशाचे कोणतेही प्रमाण आरोग्यासाठी सुरक्षित नाही. शिशाचं प्रमाण कमी असल्यानेही गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, असं मेयो क्लिनिकने त्यांच्या वेबसाइटवर म्हटलंय आहे.

तज्ज्ञ पुढे म्हणतात की, शिशाच्या विषबाधेमुळे मानसिक आणि शारीरिक विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः ६ वर्षांखालील मुलांमध्ये हे परिणाम दिसून येऊ शकतात. आणि जास्त प्रमाणात ते प्राणघातक देखील ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT