Urine Infection  Saam Tv
लाईफस्टाईल

Urine Infection : लघवी करताना जळजळ होते? 'हे' उपाय करुन पहा

मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा चिडचिड बहुतेक स्त्रियांमध्ये होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Urine Infection : मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा चिडचिड बहुतेक स्त्रियांमध्ये होते. पण घरच्या घरी अशा समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते.

बहुतेक महिलांना लघवीशी संबंधित समस्या अधिक असतात. वारंवार लघवी होणे किंवा मधूनमधून लघवी होणे, किंवा चिडचिडेपणा जाणवणे, अशा समस्यांना अनेकदा संसर्गामुळे सामोरे जावे लागते.

तुम्ही एकतर कमी प्रमाणात पाणी पिता किंवा तुम्ही सार्वजनिक शौचालयाचा वापर केला असेल, तेव्हाच हे घडते. अशा प्रकारची समस्या अधिक दिसून येते. म्हणूनच रोज कमीत कमी ८ मोठे ग्लास पाणी (Water) प्यायला हवं आणि अशी समस्या दिसल्यावर मसालेदार खाणंही टाळावं. अशा प्रकारच्या समस्येपासून तुम्ही घरच्या घरीही मुक्त होऊ शकता. आपल्याला फक्त काही गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. (Home Remedies)

लघवीमध्ये जळजळ होण्यापासून आराम मिळविण्यासाठी या मार्गांचे अनुसरण करा -

घरच्या घरी या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात आधी पुरेसं पाणी प्यायला सुरुवात करा, याशिवाय लिंबू सरबताचं सेवनही करू शकता. हे आपल्या शरीरात संक्रमण रोखण्यास खूप मदत करेल. तसेच आपल्या खाण्याच्या सवयी थोड्याफार सुधाराव्या लागतील. उदाहरणार्थ, हंगामी फळांचा रस प्या, अधिकाधिक हिरव्या भाज्या खाव्यात.

काकडी, दही, काकडी अशा थंड पदार्थांचं सेवन करा म्हणजे लघवी करताना जी चिडचिड होत आहे, ती तुम्हाला होणार नाही. याशिवाय लघवीशी संबंधित समस्येमध्ये नारळाच्या पाण्याचाही तुम्हाला खूप फायदा होतो. रोज नारळाचं पाणी प्यायल्यास लघवीत जळजळ होणार नाही, तसंच चेहऱ्यावरील ग्लोही अलगद येईल.

रोज नारळपाणी प्यायल्याने या समस्येपासून सुटका होईल -

नारळाचे पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम आहे, म्हणूनच तापापासून अनेक आजारांमध्ये नारळपाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. याशिवाय महिलांनी आपले प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवणंही गरजेचं आहे. प्रायव्हेट पार्ट्स स्वच्छ ठेवले नाहीत तर इन्फेक्शनसारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

अधिकाधिक व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचं सेवन करा. काही स्त्रिया त्यांचे मूत्र देखील धरून ठेवतात, तरीही आपल्याला लघवीमध्ये जळजळ आणि संसर्ग यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भरपूर पाणी प्या. हिरव्या भाज्या भरपूर खाव्यात आणि दही खा. घरच्या घरी या पद्धतींचा अवलंब केला तर या संसर्गापासून मुक्ती मिळू शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By : Shraddha Thik

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Mushroom Masala: अवघ्या काही मिनिटात तयार करा झणझणीत आणि चवदार मशरूम मसाला

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT