Maharashtra Live News Update : पुणे महापालिकेच्या मतदार यादींवर हरकतींचा पाऊस
Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५, राज्यात कडाक्याची थंडी, स्थानिक महापालिका निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update : पुणे महापालिकेच्या मतदार यादींवर हरकतींचा पाऊस
महापालिकेच्या प्रारूप मतदार यादींवर २२ हजार हरकती
मुदतीच्या शेवटच्या दिवशी ९८६३ हरकती दाखल
एकूण २२,८०९ हरकती दाखल झाल्या असून त्यापैकी आज शेवटच्या दिवशी तब्बल ९ हजार ८६३ हरकतींची नोंद झाली
पुण महापालिकेच्या निवडणुकीसाठी ४१ प्रभागात ३५ लाख मतदार
अकोल्यातील आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात?
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडालाय. केंद्र सरकारच्या आयुष्यान भारत योजनेत या आरोग्य केंद्राचा समावेश आहेय. या आरोग्य केंद्राला सरकारने 'आयुष्यमान आरोग्य मंदिरा'चा दर्जा दिलाये. मात्र, याच आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा संशय खुद्द सरकारमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय.
या आरोग्य केंद्राचं 'स्टिंग ऑपरेशन'च आमदार अमोल मिटकरींनी केलंय. आमदार मिटकरींनी केलेल्या पाहणी आणि 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये त्यांना रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मासाचे गोळे आढळलेत. त्यामूळे या आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा गंभीर आणि धक्कादायक आरोप आमदार अमोल मिटकरींनी केलाय
बेलापूर परिसरातून तब्बल १३ लाख ५० हजार किमतीचे ड्रग्ज जप्त केले.
नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने आज सकाळी मोठी कारवाई करत बेलापूर परिसरातून तब्बल १३ लाख ५० हजार किमतीचे ड्रग्ज जप्त केले. पंजाबमधून आलेल्या दोघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून हेरोइन आणि अफू असा अमली पदार्थांचा साठा मिळाला आहे. या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाकडून आणखी तपास सुरू असून या रॅकेटमागील इतर लोकांचा शोध सुरू आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुजोर अधिकाऱ्यांविरोधात 'टॉर्च आंदोलन
नवी मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट आणि मुजोर अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी सिटीझन फोरम आणि नवी मुंबई भाजपने नेरूळ येथे 'टॉर्च दाखवा, डोळे jउघडा' हे अभिनव आंदोलन केले. नेरूळ सेक्टर २२ मधील प्लॉट क्रमांक १२ सी आणि १२ डी हे भूखंड उद्यानासाठी आरक्षित असतानाही, माजी भ्रष्ट नगरसेवक आणि काही लालची महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने टेंडर काढून त्यावर काम सुरू करण्यात आल्याचा आरोप भाजपच्या महिला नेत्या मंगल घरत आणि आंदोलनकर्त्यांनी केला आहे.