World Toilet Day 2022 : आज 'जागतिक शौचालय दिन' आहे, इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

आज 'जागतिक शौचालय दिन' आहे.
World Toilet Day 2022
World Toilet Day 2022 Saam Tv
Published On

World Toilet Day 2022 : आज 'जागतिक शौचालय दिन' आहे. यावर्षी १९ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. त्याची सुरुवात २०१३ साली झाली. जेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्यता दिली. तेव्हापासून १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन साजरा केला जातो. लोकांना उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, सध्या चारपैकी एक जण उघड्यावर शौचास जातो. भारतातही स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील ६७ टक्के ग्रामीण लोक आणि १३ टक्के शहरी लोक (People) उघड्यावर शौचास जातात. त्याच वेळी, ४० टक्के घरांमध्ये (House) शौचालये आहेत. असे असतानाही घरातील सदस्य उघड्यावर शौचास जातो. चला, जाणून घेऊया जागतिक शौचालय दिनाचा इतिहास आणि महत्त्व.

World Toilet Day 2022
World Diabetes Day 2022 : साखरेची पातळी वाढणाऱ्या 'या' लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करत आहात का?

जागतिक शौचालय दिनाचा इतिहास -

तज्ञांच्या मते, जागतिक शौचालय दिनाची स्थापना १९ नोव्हेंबर २००१ रोजी झाली. त्याची स्थापना जेक सिम यांनी केली होती. जेक सिमच्या या प्रयत्नाचे जगभरातून कौतुक झाले. परिणामी, संयुक्त राष्ट्र संघटनेने २०१३ मध्ये जागतिक शौचालय दिनाला मान्यता दिली. तसेच १९ नोव्हेंबर हा जागतिक शौचालय दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

World Toilet Day 2022
World COPD Day : क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी म्हणजे काय ? हा आजार कसा होतो ? याचा हृदयाशी संबंध येतो का ?

जागतिक शौचालय दिनाचे महत्त्व -

जागतिक शौचालय दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश लोकांना स्वच्छता, सुरक्षितता आणि आरोग्याबाबत जागरुक करणे हा आहे. यासोबतच महिलांवरील लैंगिक शोषणाचे प्रमाणही कमी करायचे आहे. उघड्यावर शौच केल्याने संसर्गाचा धोकाही वाढतो. संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले. स्वच्छता हीच सेवा असे ते म्हणायचे. त्यासाठी गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येते. यानिमित्ताने देशभरातील लोकांना स्वच्छतेची जाणीव करून दिली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com