Surabhi Jayashree Jagdish
सोशल मीडियावर व्हायरल होत एका व्हिडिओमध्ये वॉशिंगटन सुंदर एका मुलीसोबत रेस्टॉरंटमध्ये बसलेला दिसून आला. ही क्लिप समोर येताच वॉशिंग्टन कोणाला डेट करतोय अशा चर्चा सुरु झाल्या.
रेस्टॉरंटमध्ये वॉशिंग्टनसोबत बसलेल्या या मुलीचं नाव साहिबा बाली आहे. क्लिप समोर येताच चाहत्यांनी साहिबाला वॉशिंगटन सुंदरची गर्लफ्रेंड म्हणायला सुरुवात केली.
वॉशिंगटन सुंदर नेहमीच त्याच्या गोष्टी पर्सनल ठेवतो. त्यामुळे व्हिडिओनंतर केल्या जाणाऱ्या चर्चांवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
साहिबा बाली इंडस्ट्रीमधील एक मल्टी-टॅलेंटेड आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री, होस्ट, डिजिटल क्रिएटर आणि मार्केटिंग प्रोफेशनल या सर्व भूमिका तिने पार पाडल्या आहेत.
5 डिसेंबर 1994 रोजी काश्मीरी कुटुंबात जन्मलेल्या साहिबाला लहानपणापासूनच अभ्यास आणि क्रिएटिव्हिटीची आवड होती.
दिल्ली विद्यापीठातून इकॉनॉमिक्सचे शिक्षण घेत असताना साहिबाने थिएटर आणि स्ट्रीट प्लेमध्ये भाग घेतला होता. पुढे तिने बिझनेस स्कूलमध्ये मार्केटिंगचे शिक्षण घेतलं ज्यामुळे तिच्या करिअरला कॉर्पोरेट क्रिएटिव्ह दिशा मिळाली.
अभिनयाची इच्छा तिला पुन्हा कला क्षेत्रात घेऊन आली. चित्रपट आणि ओटीटीमध्ये कलाकार म्हणून दिसण्यासोबतच तिने अनेक ब्रँड्स आणि स्टार्टअप्ससाठी कंटेंट स्ट्रॅटेजीचे कामही केले.
सोशल मीडियावर चर्चांचा जोर वाढत असला तरी दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.