Pune : पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेवर आणखी एक गुन्हा, नवरा-बायकोच्या वादात...

Pune woman lawyer extortion second FIR : पुण्यात पुरुषावर अत्याचार आणि ब्लॅकमेल केल्याच्या आरोपांनंतर त्या महिला वकिलावर आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मुंढवा पोलिसांनी दोन लाखांच्या खंडणीप्रकरणी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू आहे.
Pune woman lawyer
Pune woman lawyer
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune crime news woman accused of extortion : पुण्यात कोथरूडमध्ये पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेवर आणखी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरा-बायकोच्या वादाचा फायदा त्या व्यक्तीशी लगट साधली अन् २ लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्या महिलेवर करण्यात आहे. मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे. पोलिसांकडून फोन कॉल अन् इतर माहिती तपासली जात आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील कोर्टात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील मुंढवा पोलिसात त्या महिला वकिलाच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती-पत्नीच्या केसमध्ये मदत करते असे सांगत तिने दोन लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे, या महिला वकिलाच्या विरोधात कोथरूड पोलिसात याआधीच एक गुन्हा दाखल झालेले आहे. पुरूषावर अत्याचार करून व्हिडिओ अन् फोटोच्या मदतीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्या महिलेवर करण्यात आलेला आहे. आता त्याच महिलेवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे., पोलिसांकडून महिलेला तपासासाठी नोटीस बजावली आहे. लवकरच चौकशी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.

Pune woman lawyer
Pune : महिलेचा पुरूषावर बलात्कार, अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल, पुण्यात खळबळजनक घटना

नेमकं प्रकरण काय ?

यातील फिर्यादीची त्यांच्या पत्नीसोबत कौटुंबिक न्यायालयामध्ये केस सुरू आहे. या केसमध्ये मदत करते असे सांगून फिर्यादीला महिला वकिलाने जवळीक साधली. मी हायकोर्टामध्ये वकील आहे, तुला मदत करते असे म्हणून 38 वर्षे फिर्यादीसोबत जवळीक साधली. त्या व्यक्तीसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. महिला वकिलाने त्याला काही अश्लील फोटोच्या मदतीने ब्लॅकमेल केला. त्याच्याकडे लाखोंची खंडणी मागितली. तक्रारदाराला फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच मुंढवा पोलिस स्टेशन गाठले. कोथरूड आणि आता मुंढवा या दोन ठिकाणावर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर पुणे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Pune woman lawyer
Pune : पुण्याहून थेट नाशिकपर्यंत ट्रेनचा प्रवास, कसा असेल मार्ग, कोणत्या शहराला होणार फायदा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com