Urine Infection : युरिन इन्फेक्शन होण्याची अनेक कारणे आहेत. ही समस्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये समान प्रमाणात आढळते. काही वेळा अस्वच्छतेच्या अभावामुळे युरिन इन्फेक्शनही होऊ शकते. उदाहरणार्थ, लघवी जास्त वेळ रोखून ठेवणे, मासिक पाळी दरम्यान साफसफाईकडे दुर्लक्ष करणे यामुळे ही समस्या उद्भवू शकते. मात्र, तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही युरिन इन्फेक्शन टाळू शकता.
आयुर्वेदानुसार वेलचीच्या सेवनाने या समस्येत आराम मिळतो. वेलची पावडर दुधात उकळा. चांगली उकळी आल्यावर कोमट झाल्यावर सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास त्यात साखर मिसळूनही पिऊ शकता.
एका अभ्यासानुसार, क्रॅनबेरीचा रस युरिन इन्फेक्शनचा धोका कमी करण्यास मदत करतो. संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता.
लसणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीफंगल मुबलक प्रमाणात आढळतो, जे तुम्हाला संसर्गापासून वाचवण्यास मदत करते. जेवणात लसणाचे नियमित सेवन करा.
युरिन इन्फेक्शन टाळण्यासाठी तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करू शकता. तुम्हाला हवे असल्यास नारळाच्या पाण्यात गूळ आणि धने पावडर मिसळून पिऊ शकता. हे युरिन इन्फेक्शनला प्रतिबंध करते.
पाणी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. अशा परिस्थितीत तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितकी जास्त घाण तुमच्या शरीरातून बाहेर पडेल. लघवी करताना त्रास होत असेल किंवा लघवी करताना जळजळ होत असेल तर भरपूर पाणी प्या. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.