cooking daal saam tv
लाईफस्टाईल

डाळ शिजवताना त्यावर येणारा फेस आरोग्यासाठी धोकादायक? पाहा तुमच्या प्रश्नाचं उत्तर

सध्या सोशल मीडियावर शिजवलेल्या डाळींवर पांढरा फेस का येतो , याची खूप चर्चा होतेय. याला सॅपोनिन कशाला म्हटलं जातं.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या दररोजच्या जेवणात आपण डाळीचा समावेश करतो. काही लोकांचं जेवण हे डाळ भाताशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. इतंकच काय प्रत्येकाच्या घरी डाळ बनवण्याची पद्धत देखील वेगवेगळी असते. मात्र तुम्ही कधी डाळ शिजवताना त्यावर आलेला फेस पाहिलाय का?

सध्या सोशल मीडियावर शिजवलेल्या डाळींवर पांढरा फेस का येतो , याची खूप चर्चा होतेय. याला सॅपोनिन कशाला म्हणलं जातं. मात्र याचं दररोज सेवन केलं तर ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते का? असा सवाल अनेकांच्या मनात आहे. आज आपण यामागील विज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत.

मुळात सॅपोनिन हा एक नैसर्गिक पदार्थ असून तो अनेक प्रकारच्या डाळी आणि बीन्समध्ये आढळतो. एक प्रकारे, ते बीन्स आणि वनस्पतींना संरक्षण देतं. याशिवाय डाळ शिजवताना तयार होणारा पांढरा फेस तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

प्युरीन

फेसामध्ये प्युरीन असतं. ज्यामुळे शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी वाढू शकते. जर तुमच्या शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं तर किडनीच्या समस्या बळावू शकतात. याशिवाय हृदयविकाराचा झटका आणि सांध्यांच्या समस्या जाणवू शकतात.

सेपॉनिन

या फेसामध्ये सॅपोनिन्स देखील असतात. हे नैसर्गिकरित्या उद्भवणारे संयुगं असतात ज्यामुळे पोटं फुगणं आणि पोट खराब होणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

प्रोटीन बाहेर पडतं

डाळ उकळल्याने त्यामध्ये असलेलं प्रोटीन उकळल्यावर हवेतील कणांमुळे फेस तयार होतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आरोग्याचे धोके कमी करण्यासाठी तुम्ही डाळीचं सेवन करण्यापूर्वी फेस काढू शकता.

सॅपोनिनमध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि प्रोटीन असतात. अनेक प्रकारच्या रिसर्चमधून हे समोर आलंय की, सॅपोनिन्समध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असू शकतात. ज्याचे अनेक फायदे आहेत. जास्त प्रमाणात सॅपोनिनचे सेवन केल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Hair Care Tips: हिवाळ्यात केसांना तेल कधी लावावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटेंना 1 लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

माणिकराव कोकाटेंना जेल की बेल, फैसला कधी? न्यायमूर्तींनी एका वाक्यात सांगितलं | VIDEO

कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

Saturday Horoscope: संधीचं सोनं कराल, ५ राशींना नशीब देणार साथ, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT