Sweet After Dinner, Is it healthy to eat sweets after Dinner  Saam Tv
लाईफस्टाईल

Sweet After Dinner : थांबा! जेवल्यानंतर तुम्हालाही गोड खाण्याची सवय आहे? जडू शकतात गंभीर आजार

Is it healthy to eat sweets after Dinner : जेवल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना गोड खाण्याची सवय आहे. काही ना गोड खाण्याची इतकी क्रेव्हिंग होते की, ते गोड खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. पण असे म्हटले जाते रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारे हानी होते.

कोमल दामुद्रे

Do not Eat Sweet Dish After Dinner :

जेवल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना गोड खाण्याची सवय आहे. काही ना गोड खाण्याची इतकी क्रेव्हिंग होते की, ते गोड खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. पण असे म्हटले जाते रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारे हानी होते.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गोड खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या जेवणानंतर गोड खाणे आरोग्यासाठी (Health) अनेक प्रकारे हानी होते. तसेच शरीराला कशाप्रकारे नुकसान होते जाणून घेऊया.

1. वजन वाढणे

डॉक्टर सांगतात की, रात्रीच्या जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते. मिठाईत असणऱ्या साखरेमुळे (Sugar) शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. त्यामुळे शरीरात चरबी जमा होते. यासाठी रात्रीच्या जेवणानंतर गोडाचे पदार्थ खाणे टाळा.

2. पचनसंस्था

वजन वाढण्यासोबतच रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. यामुळे पचनक्रिया बिघडू शकते. पचनसंस्थेत बिघाड झाल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह नियंत्रित करते. ज्यामुळे अनेक आजार (Disease) उद्भवतात.

3. हृदयावर परिणाम

रात्रीच्या वेळी गोडाचे पदार्थ खाल्ल्याने हृदयावर परिणाम होतो. जास्त प्रमाणात साखरेचे पदार्थ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

4. झोपेचा त्रास

डॉक्टरांच्या मते, रात्री गोड खाल्ल्याने शरीरातील एनर्जी लेव्हल वाढते. यामुळे मेंदू सक्रिय होतो, ज्यामुळे झोपेचे चक्र विस्कळीत होते. तसेच झोपेची कमतरता हे देखील अनेक आजारांचे कारण आहे.

5. साखरेची पातळी

रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी खराब होते. यामुळे चिंता, मूड बदलणे, डोकेदुखी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT