Manasvi Choudhary
केस विंचरण्यासाठी आपण सर्वजण कंगवा वापरतो. दिवसातून अनेकवेळा कंगव्याने केस विंचरतो. परंतु, या कंगव्याच्या स्वच्छतेकडे आपण दुर्लक्ष करतो.
तुटलेले केस, तेल, केसांतील कोंडा कंगव्यावर जमा झाल्याने कंगवा खराब होतो, घाण दिसतो. यासाठी केसांचा कंगवा स्वच्छ करणे महत्वाचे आहे.
जर तुमचे केस नॉर्मल असतील, तर केसांचा कंघवा आठवड्यातून एकदा आवर्जून स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जर तुमचे केस जास्त तेलकट असतील तर हेअर जेल, सीरम, हेअर स्प्रे यांसारख्या उत्पादनांचा वापर करत असाल, तर कंगव्यावर चिकटपणा लवकर साचतो. अशा वेळी कंगवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा धुणे फायदेशीर आहे.
जर एकापेक्षा जास्त व्यक्ती एकच कंगवा वापरत असतील, तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा कंगवा स्वच्छ करा.
सर्वात आधी कंगव्यामध्ये अडकलेले केस, तेल आणि घाण स्वच्छ करा.
एका मोठ्या भांड्यात कोमट पाण्यात साबण किंवा शॅम्पू टाका. त्यानंतर कंगवा १० ते १५ मिनिटे भिजत घाला.
नंतर एका जुन्या टूथब्रशच्या साहाय्याने कंगव्याचे घाण, तेल आणि मळ स्वच्छ करा.
कंगवा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कापडाने तो पूर्णपणे पुसून कोरडा करा. ओला कंगवा लगेच ड्रॉवरमध्ये ठेवणे टाळा.