Maharashtra News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा पुन्हा लांबणीवर?

Marathi Breaking Live Headlines Updates: राष्ट्रवादीचे विलिनीकरण,शरद पवार,छठ पूजा वाद, राज्यात थंडीची चाहूल, प्रदूषण वाढले, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा पुन्हा लांबणीवर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बारामती दौरा पुन्हा लांबणीवर?

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे

त्यासाठी पंतप्रधान यांचा बारामती दौरा यापूर्वी ३ नोव्हेंबर रोजी होणार होता मात्र हा दौरा स्थगित करण्यात आला होता

त्यानंतर १६ नोव्हेंबर ही संभाव्य तारीख पुढे आली होती मात्र आता हा ही दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे

"जिंकले की गुलाल आणि हरले की ईव्हीएमवर खापर"; मंत्री जयकुमार गोरे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

रहिमतपूर येथील विविध विकासकामांच्या कार्यक्रमात बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर घणाघाती टीका केली.

मोठ्या शहरांमध्ये आंदोलने करून देशात अराजकता माजल्याचा खोटा प्रचार काँग्रेस करत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने निर्माण केलेल्या संविधानिक संस्थांवर आणि न्यायव्यवस्थेवर स्वतःच्या सोयीनुसार संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.