Hair Care: केसगळती होईल कमी, केस होतील दाट आणि मजबूत! घरीच बनवा हा खास प्रोटीन हेअर मास्क

Shruti Vilas Kadam

हेअर मास्क कसा बनवावा?

एका वाटीत २ चमचे दही घ्या. त्यात अर्धे पिकलेले केळे चांगले कुस्करून टाका. आता त्यात लिंबाच्या रसाचे ७ ते ८ थेंब घाला. शेवटी थोडासा कोरफडीचा गर टाका. सर्व मिश्रण चांगले एकत्र करा. तुमचा हेअर मास्क तयार आहे.

Hair Care | Saam Tv

केसांना ओलावा मिळतो

दही केसांसाठी चांगले मानले जाते. केसांना दही लावल्यामुळे त्यांचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे केस मऊ राहतात.

Hair Care | Saam Tv

केस मऊ आणि चमकदार होतात

केळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. केसांना केळ्याचा मास्क लावल्यामुळे केस मऊ होण्यास मदत होते. त्यामुळे केस अधिक छान आणि चमकदार दिसतात.

Hair Care | Saam Tv

केसांचा कोरडेपणा कमी होतो

कोरफडीचा गर केसांना ओलावा देतो. त्यामुळे कोरड्या आणि निस्तेज केसांसाठी या मास्कचा वापर करू शकता.

Hair Care | Saam TV

केसांची चमक वाढते

दही आणि केळी एकत्र करून केसांना लावल्यामुळे केस मऊ होण्यास मदत होते. यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होऊन ते चमकदार दिसू शकतात.

Hair Care | Saam tv

केस विंचरणे होते सोपे

कोरड्या केसांचा गुंता होतो आणि केस विंचरताना तुटू शकतात. हा मास्क लावल्यामुळे केस मऊ होण्यास मदत होते. त्यामुळे केस विंचरणे सोपे जाते.

Hair Care | Saam tv

केसांना हेअर मास्क कसा लावावा?

तयार केलेला मास्क केसांच्या लांबीला आणि टोकांना लावा. १५ ते २० मिनिटे तसाच ठेवा. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा. हा मास्क लावण्यापूर्वी थोड्या त्वचेवर लावून पाहा. जळजळ किंवा खाज होत असल्यास वापरू नका. टाळूला जखम असल्यास लिंबाचा रस लावणे टाळा.

Hair care | Saam Tv

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Hair Care:

Skin Care: पिंपल्स आणि त्वचेची जळजळ होईल कमी! रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'हे' खास तेल, मिळेल ग्लोईंग फेस

Skin Care | Saam TV
येथे क्लिक करा