Drinking water on empty stomach saam tv
लाईफस्टाईल

Water In Morning: सकाळी रिकामी पोटी थंड की गरम पाणी पिणं योग्य? वाचा तुमच्या शरीरासाठी काय योग्य?

Drinking water on empty stomach: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी पिणं हे आरोग्यासाठी महत्त्वाची सवय मानली जाते. पण प्रश्न असा आहे की, गरम पाणी प्यावं की थंड पाणी? तज्ज्ञ डॉक्टर याबाबत स्पष्ट मार्गदर्शन करतात.

Surabhi Jayashree Jagdish

सकाळी उठल्यावर पाणी प्यावं असं तुम्हाला डॉक्टरांनी नक्की सांगितलं असेल. आपल्यापैकी अनेक जण ते फॉलो देखील करतात. मात्र बऱ्याचदा आपल्याला हा प्रश्न पडतो की, सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यावं की थंड पाणी प्यावं. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सहा ते आठ तासांच्या झोपेनंतर शरीर थोडेसं डिहायड्रेट होतं. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने अंतर्गत सिस्टीम पुन्हा सुरू होण्यास मदत होते.

सकाळी पाणी पिणं का फायदेशीर?

सकाळी उठल्याबरोबर पाणी प्यायल्याने तुमची दीर्घकाळापासून शांत असलेली पचनक्रिया एक्टिव्ह होते. याला नैसर्गिक डिटॉक्स करण्याच्या प्रक्रियेला मदत होते आणि शरीर दिवसासाठी तयार होतं. यामुळे पचनसंस्था काम करण्यासाठी एक्टिव्ह होते तक नियमित आतड्यांच्या हालचालींना मदत मिळते.

कोमट पाणी

रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणं हा सर्वोत्तम पर्याय मानण्यात येतो. ते पचनसंस्थेसाठी खूप हलकं मानलं जातं. सकाळी असं पाणी प्यायल्याने आतड्यांतील स्नायूंना आराम मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पचन सोपं होतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होते. हे शरीरातील रात्री जमा झालेले टॉक्सिन पदार्थ काढून टाकतं.

थंड पाणी

थंड पाणी पिण्याचे फायदे आहेत. मात्र झोपेतून उठल्यानंतर लगेचच थंड पाणी पिणं हे योग्य नाही. खूप थंड पाणी पचनसंस्थेसाठी योग्य मानलं जात नाही. यामुळे पचनक्रिया मंदावते किंवा घशात जळजळ होऊ शकते. ते थोड्या प्रमाणात कॅलरीज बर्न करण्यास मदत करतं कारण शरीर ते गरम करण्यासाठी ऊर्जा वापरतं. सकाळच्या व्यायामानंतर थंड पाणी फायदेशीर आहे.

पचनसंस्थेला कसा प्रतिसाद मिळतो यामध्ये पाण्याचं तापमान महत्त्वाची भूमिका बजावतं. पाण्याचं योग्य तापमान हे कोमट पाणी एंजाइमची क्रिया वाढवतं. परिणामी तुमचं पचन सोपं होतं. याशिवाय थंड पाण्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात ज्यामुळे पचन प्रक्रिया मंदावते. म्हणूनच रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणं पसंत केलं जातं.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT