Diabetes breakfast tips google
लाईफस्टाईल

Diabetes Diet: इडली, डोसा डायबेटिस पेशंटसाठी चांगला की वाईट? सोप्या ब्रेकफास्ट टिप्स फॉलो करा

Blood Sugar Control: डायबेटिस असलेल्या रुग्णांनी इडली-डोसा खावा की नाही, याबाबत नेहमी संभ्रम असतो. योग्य प्रमाण, मल्टिग्रेन आणि कमी तेल वापरल्यास हा नाश्ता सुरक्षित ठरतो.

Sakshi Sunil Jadhav

डायबेटीसच्या रुग्णांना नेहमीच खाण्यापिण्याचं पत्थ पाळावं लागतं. त्यामध्ये बरेच पदार्थ टाळण्याचा डॉक्टर त्यांना सल्ला देतात. या रुग्णांचा दिवसाच्या सुरुवातीचा नाश्ता महत्वाचा आहार मानला जातो. त्याने शरीराला आवश्यक असणारे फायबर आणि प्रोटीन मिळतं आणि दिवसभर ऊर्जा टिकते. त्यात एक पदार्थ म्हणजे इडली आणि डोसा. हे पारंपरिक पदार्थ देशभरात नाश्त्यासाठी आवडीने खाल्ले जातात. मात्र डायबेटीज असलेल्या रुग्णांच्या मनात नेहमीच प्रश्न असतो की, इडली-डोसा खाणं सुरक्षित आहे का?

तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास डायबेटिस असलेले रुग्णही इडली आणि डोसा खाऊ शकतात. हे दोन्ही पदार्थ तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून तयार केले जातात. त्यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असतं. सांबारमध्ये प्रोटीन आणि भाज्यांमधून मिळणारं फायबर भरपूर असतं, तर नारळ आणि टोमॅटो चटणीमुळे आवश्यक पोषक घटक मिळतात.

इडलीचा ग्लायसेमिक इंडेक्स साधारणतः कमी ते मध्यम असतो. इडलीचे पीठ आंबवलेलं असतं. त्याने शरीरातलं फायबरचं प्रमाण वाढतं आणि कार्बोहायड्रेट्स हळूहळू रक्तात शोषले जातात. डोशाचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, मात्र त्यामध्ये भाज्या, डाळी किंवा मल्टिग्रेन घटक वापरल्याने रक्तातील साखरेवर होणारा परिणाम कमी करता येतो.

डॉक्टर सांगतात की, डायबेटिस असलेल्या व्यक्तींनी इडली-डोसा खाताना प्रमाणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राईस, ज्वारी, बाजरी, ओट्स किंवा नाचणी यांसारख्या धान्यांचा वापर केल्यास फायबरचे प्रमाण वाढतं. तर डोसा बनवताना तेल कमी वापरणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. नाश्त्यासोबत दही, डाळी किंवा भाज्यांचा समावेश केल्यास कार्बोहायड्रेट्सचे शोषण नॉर्मल पद्धतीने होते.

योग्य साहित्य वापरून तयार केलेल्या इडली आणि डोशामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. जे मधुमेह नियंत्रणासाठी खूप महत्त्वाचं आहे. मर्यादित प्रमाणात कार्बोहायड्रेट्स शरीराला आवश्यक ऊर्जा देतात. याशिवाय भाज्यांमधून मिळणारे जीवनसत्त्वं आणि खनिजे एकूण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. इडली आणि डोसा पचायला हलका असल्यामुळे पचनाच्या तक्रारी असलेल्या डायबेटिस रुग्णांसाठीही हे पदार्थ योग्य मानले जातात. आंबवण्याची प्रक्रिया केल्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारतं आणि पोषक घटकांचे शोषण जास्त चांगल्या प्रकारे होते.


टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लाडक्या बहिणींना योग्यवेळी 2100 रुपये देणार-एकनाथ शिंदे

शिंदेंच्या भावाचं नाव ड्रग्ज प्रकरणात? बड्या नेत्याचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Ananya Panday: अनन्या पांडेचा रस्ट कलर साडी लूक पाहिलात का?

माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, समर्थकांचा मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमाव|VIDEO

सगळ्यांना खदखदून हसवणारी कॉमेडी क्वीन दुसऱ्यांना झाली आई; शुटिंगला जाताना आल्या प्रसृती कळा

SCROLL FOR NEXT