Soft Idli Recipe: इडली फुगतच नाही? बॅटरमध्ये घाला '१' पदार्थ, सॉफ्ट - साऊथ स्टाईल इडलीचं सिक्रेट

Rava Idli: सकाळच्या नाश्त्यासाठी सॉफ्ट साऊथ स्टाईल इडली तयार करा. रव्याचा वापर करून झटपट १० मिनिटांत तयार होणारी इडली, इनोने फुलवण्याचा सोपा आणि प्रभावी ट्रिक येथे दिला आहे.
Secret Tip for Perfect South Indian Idli Every Time
Soft Idli Recipegoogle
Published On
Summary
  1. रवा आणि दही मिक्स करून तुम्ही गरमा गरम इडल्या बनवू शकता.

  2. पीठात १ चमचा इनो घालून लगेचच इडली तयार करता येते.

  3. गॅस स्लो ठेवून १५ मिनिटे वाफवा, नंतर सुर किंवा टुथपिक वापरून इडली काढा.

  4. नारळाच्या किंवा शेंगदाण्याची चटणीसोबत गरम खायला तयार.

सकाळचा नाश्ता हा आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचा मानला जातो. लोक सकाळच्या नाश्त्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. पण तुम्ही दिवसाची सुरुवात जर हेल्दी आणि पौष्टीक नाश्त्याने केलीत तर दिवसभर तुम्हाला काम करण्यासाठी ऊर्जा मिळते. त्यासाठी तुम्ही हलक्या फुलक्या आणि मऊलुसलुशीत इडल्या तयार करु शकता. मात्र अनेक महिलांना इडली तयार करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. काही वेळेस पीठ व्यवस्थित फुगत नाहीत तर कधी इडलीचं जाड होतात. आता याचं टेन्शन सोडा आणि हा एक पदार्थ वापरुन सॉफ्ट साऊथ स्टाईल इडली बनवा.

तुम्हाला यासाठी तांदूळ डाळ भिजवायची गरज नाही. पुढे आपण इंस्टंट इडलीची रेसिपी पाहणार आहे. यासाठी तुम्हाला रवा लागेल. तुम्ही फक्त १० मिनिटांत चविष्ट रवा इडळी बनवून ते सांगत आहोत. यासाठी फक्त दहा मिनिटे लागतील. यासाठी तुम्हाला बाजारातून पीठ खरेदी करण्याची गरज लागणार नाही. चला जाणून घेऊया.

Secret Tip for Perfect South Indian Idli Every Time
Moong Dal Tikki Recipe: मूग डाळ टिक्की क्रिस्पी होत नाहीये? मग हा १ पदार्थ करा मिक्स

रव्याची इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम १ कप बारीक रवा एका भांड्यात ठेवा. त्यामध्ये अर्धा कप दही घालून मिक्स करा. त्यात १ चमचा मीठ आणि ४ कप पाणी घाला. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन ३० मिनिटे झाकूण ठेवा. पुढे इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवा. आता पीठात १ चमचा इनो घालून पीठ मिक्स करा. त्याने त्वरित तुमचं बॅटर फुलेल, ते तुम्ही इडलीच्या भांड्यात लगेचच टाकून घ्या आणि १५ मिनिटे वाफवा.

तयार इडली काढण्यासाठी तुम्ही सुरु किंवा टुथपिकचा वापर करु शकता. जर इडली चिपकली असेल तर पुन्हा त्यावर झाकण ठेवून वाफवून घ्या. अन्यथा तुमच्या इडल्या तुटतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इडली करताना गॅस स्लो ठेवा. तयार होईल तुमची सॉफ्ट इडली. तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत इडली नाश्त्याला खाऊ शकता.

Secret Tip for Perfect South Indian Idli Every Time
Cancer Alert: आताच सावध व्हा! नकळत या गोष्टींमुळे वाढतोय कॅन्सरचा धोका, अन्यथा मोठी किंमत चुकवावी लागेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com