Sakshi Sunil Jadhav
घरामध्ये रोज नुसता वरण भात खाण्यापेक्षा झटपट टेस्टी मुगाच्या टाळीची टिक्की तुम्ही बनवू शकता.
१ कप मुग डाळ, १ कांदा, २ हिरव्या मिरच्या, अदरक, लसूण, कोथिंबीर, धणे-जीरे पावडर, हळद, चाट मसाला, बेसन, मीठ आणि तेल इ.
सर्वप्रथम मुग डाळ स्वच्छ धुवून ३ ते ४ तास पाण्यात भिजत ठेवा.
आता डाळ, मिरच्या, जिरे, आले-लसणाची पेस्ट तयार करुन घ्यावी.
पेस्टमध्ये कोथिंबीर चिरलेला बारिक कांदा, बेसन आणि सगळे मसाले मिक्स करुन घ्या.
आता पिठामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून टिक्की तयार करु शकता. मग एका कढईत किंवा तव्यात तळायला घ्या.
टिक्की क्रिस्पी हवी असल्यास तुम्ही तांदळाच्या पिठाचा सुद्धा वापर करु शकता. आता गरमा गरम टिक्की चटणीसोबत सर्व्ह करा.