Saam Tv
जाड तांदूळ, उडीद डाळ, तेल, मीठ, पोहे, मेथी दाणे इ.
सगळ्यात आधी तांदूळ आणि स्वच्छ धुवून घ्या. मग त्यात पोहे आणि २ चमचे मेथी दाणे घालून रात्रभर भिजत ठेवा.
आता डाळ, तांदूळ मिक्सरमधून वाटून घ्या. मग तयार पीठ पुन्हा आंबवण्यासाठी ठेवा.
तुम्ही स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी आणि इडली पात्राला हलकेसं तेल लावून घ्या.
इडलीचे बॅटर घ्या आणि त्या इडली पात्रात १५ ते २० मिनिटे इडली स्लो गॅसवर वाफवून घ्या.
मग हलक्या हाताने इडल्या काढून घ्या आणि गरमा गरम सॉफ्ट इडली काढून घ्या.
तुम्ही नारळाच्या चटणी किंवा सांबारसोबत या इडल्या सर्व्ह करू शकता.