High cholesterol SAAM TV
लाईफस्टाईल

High cholesterol: हाय कोलेस्ट्रॉल शरीरात वाढतंय? डोळ्यांपासून पायांपर्यंत दिसणारे हे 7 संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका

High cholesterol symptoms: हाय कोलेस्ट्रॉल अनेकदा कोणतीही लक्षणं न देता वाढत राहतं. मात्र डोळ्यांभोवती पिवळे डाग, त्वचेवरील गाठी, पाय दुखणे, थंड वाटणे किंवा जखम उशिरा भरणे यांसारखे संकेत दिसू शकतात. लिपिड प्रोफाइल तपासणी आणि डॉक्टरांचा सल्ला का महत्त्वाचा, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

हाय कोलेस्ट्रॉलला सायलेंट समस्या म्हटलं जातं. कारण बहुतांश लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं तरी कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. वर्षानुवर्षे LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल वाढत राहून रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर जमा होऊ शकतो आणि पुढे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. मात्र काही वेळा शरीर काही संकेत देतं.

एका वेबसाईटला माहिती देताना मुंबईतील कार्डियाक सर्जन डॉ. बिपिनचंद्र भामरे यांनी सांगितलं की, बहुतेक लोकांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलची कोणतीही बाह्य लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे आरशात दिसणाऱ्या संकेतांपेक्षा लिपिड प्रोफाइलमधून कोलेस्ट्रॉल तपासणं अधिक महत्त्वाचं आहे.

डोळ्यांच्या पापण्यांभोवती पिवळे डाग

पापण्यांभोवती पिवळसर डाग दिसणं याला ‘झॅन्थेलाझ्मा’ म्हणतात. त्वचेखाली चरबीयुक्त पदार्थ साचल्याने ते दिसतात. मात्र याचा अर्थ नेहमी कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे असं नाही. लहान वयात असे डाग दिसणं किंवा कुटुंबात हार्टचा इतिहास असेल तर लिपिड प्रोफाइल तपासणं योग्य आहे.

कोपर, गुडघे किंवा सांध्यांवर पिवळसर गाठी

‘झॅन्थोमा’ नावाच्या चरबीच्या गाठी त्वचेवर किंवा टेंडनवर टाचेजवळही दिसू शकतात. खूप जास्त कोलेस्ट्रॉल आणि आनुवंशिक ‘फॅमिलियल हायपरकोलेस्ट्रोलेमिया’मध्ये हे आढळू शकतात.

डोळ्याभोवती करडं-पांढरं वर्तुळ

कॉर्नियाच्या कडेला दिसणारं करडं-पांढरं वर्तुळ ‘कॉर्नियल आर्कस’ असू शकतं. वय वाढल्यावर ते सामान्य असू शकतं. मात्र तरुण व्यक्तीमध्ये विशेषतः कौटुंबिक इतिहास असल्यास, कोलेस्ट्रॉल तपासणं महत्त्वाचं आहे.

चालताना पोटरीत दुखणं

चालताना किंवा जिने चढताना पोटरीत दुखणं, आकडी येणं आणि थांबल्यावर आराम मिळणं हे पायांच्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्याचं म्हणजेच PADचं लक्षण असू शकतं.

एक पाय दुसऱ्यापेक्षा थंड वाटणं

एक पाय दुसऱ्यापेक्षा थंड वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. यासोबत वेदना, मुंग्या, त्वचेचा रंग बदलणं किंवा रक्तपुरवठा कमी असल्याची चिन्हं असतील तर तपासणी गरजेची आहे.

पायांवरील केस कमी होणं

पायांमध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यास केसांची वाढ आणि नखांची वाढ मंदावू शकते. मात्र, वय, हार्मोन्स आणि इतर आजारांमुळेही हे होऊ शकतं.

पायावरील जखम उशिरा भरणे

पायाची छोटी जखमही बराच काळ भरत नसेल तर रक्तपुरवठ्याची समस्या असू शकते. मधुमेह असणाऱ्यांनी आणि धूम्रपान करणाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावं.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भात पावसाची तूट; बळीराजाची चिंता वाढली!

Onions Cutting : कांदा कापताना डोळ्यांत पाणी का येतं? कारण वाचून थक्क व्हाल

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठा बदल! १ तोळ सोने ३३३० रुपयांनी महागलं, जाणून घ्या आजचे ताजे दर

Pune BJP : धक्कादायक! भाजपच्या बड्या नेत्याच्या कारची तोडफोड, पुण्यात खळबळ; CCTV चे वायर कापून...

Ambernath : नदीकाठी वसलेलं ११व्या शतकातील शिवमंदिर, काळ्या पाषाणातील अप्रतिम कोरीवकाम पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT