Maharashtra News Live Update: नरक चतुर्दशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट

Marathi Breaking Live Headlines Updates : दिवाळी पाडवा, लक्ष्मीपूजन; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, शरद पवार हेल्थ अपडेट, हवामानाचा अंदाज, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Maharashtra News Live Update: नरक चतुर्दशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट

दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त नरक चतुर्दशीच्या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांची व आकर्षक पानांची मनमोहक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी सुमारे दीड टन फुलांचा वापर करण्यात आला असून, मंदिर परिसराला आकर्षक व प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले आहे.

दिवाळी पहाटेसाठी डोंबिवलीचा फडके रोड सज्ज; विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आणि भव्य रांगोळ्यांनी परिसराला सणाचे स्वरूप!

* दिवाळी पहाट निमित्त डोंबिवलीच्या प्रसिद्ध फडके रोडवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.

* फडके रोडसह ग्रामदैवत गणपती मंदिराला विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

* परिसरात भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या असून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

* डोंबिवलीसह आसपासच्या शहरांतील तरुण-तरुणींच्या स्वागतासाठी फडके रोड सज्ज झाला आहे.

* दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण आणि गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

परिचारकांना मोठा दिलासा; जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मंजूर, शिंदे-मोहिते पाटलांचे अपील फेटाळले

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पंढरपूरचे भाजप नेते प्रशांत परिचारक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छाननीत बाद करण्यात आलेला त्यांचा उमेदवारी अर्ज विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे परिचारक यांचा बँकेतील मार्ग आता मोकळा झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.