Railway Rule : रेल्वेने दिवाळीला गावी जाताय? मग चुकूनही बॅगेत फटाके ठेवू नका; अन्यथा होऊ शकते शिक्षा

Diwali Crackers Railway Rule News : दिवाळीत रेल्वेने गावी जाताना बॅगेत फटाके ठेवताय? सावधान! रेल्वे प्रवासात फटाके नेण्यास मनाई असून रेल्वे कायद्याच्या कलम १६४ नुसार तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
Railway Firecrackers Rules News
Railway Firecrackers Rules NewsAI Image
Published On: 
Summary
  • दिवाळीच्या काळात रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी

  • रेल्वे प्रवासात फटाके आणि प्रतिबंधित स्फोटक पदार्थ सोबत नेण्यास मनाई

  • फटाक्यांमुळे आग लागण्याची किंवा स्फोट होण्याची शक्यता

  • रेल्वे प्रशासन आणि RPF कडून प्रवाशांच्या सामानाची तपासणी

Indian Railways Rules For Carrying Firecrackers Diwali दिवाळी म्हटलं की आनंद, उत्साह, फराळ, मिठाई आणि फटाक्यांची आतषबाजी आलीच. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेक जण आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी गावाकडे जातात. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अशा वेळी अनेकजण नातेवाईकांसाठी मिठाई, भेटवस्तू आणि मुलांसाठी फटाके घेऊन प्रवास करतात. मात्र, तुम्हीही रेल्वेने प्रवास करताना बॅगेत फटाके ठेवण्याचा विचार करत असाल, तर सावध व्हा. कारण रेल्वे प्रवासात फटाके घेऊन जाणे तुम्हाला महागात पडू शकते.

रेल्वे प्रवासात सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. फटाके हे ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थांच्या श्रेणीत येतात. त्यामुळे रेल्वेच्या नियमांनुसार प्रवासी डब्यांमध्ये असे पदार्थ घेऊन जाण्यास मनाई आहे. गर्दीच्या डब्यात फटाक्यांची पिशवी असणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रवासादरम्यान घर्षण, उष्णता किंवा आगीच्या संपर्कामुळे फटाक्यांना आग लागण्याची शक्यता असते. अशी दुर्घटना घडल्यास केवळ संबंधित व्यक्तीलाच नाही, तर डब्यातील इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.

Railway Firecrackers Rules News
Ghee Tea Benefits : चहात चमचाभर तूप घालून प्यायल्यानं काय होतं? तूप घातलेला चहा का, कोणी प्यावा, समजून घ्या

ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दल (RPF) प्रवाशांच्या सामानाची तपासणी करतात. स्थानकांवर तसेच रेल्वे गाड्यांमध्ये संशयास्पद वस्तूंवर विशेष लक्ष ठेवले जाते. नियमांचे उल्लंघन करून फटाके किंवा इतर स्फोटक पदार्थ घेऊन जाणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते.

Railway Firecrackers Rules News
Healthy Lifestyle : शौचास बसताना तुम्हीही करता का 'ही' चूक? आजच सुधारा नाहीतर आयुष्यात येईल भयानक संकट

रेल्वे कायद्यातील कलम १६४ नुसार, स्फोटक पदार्थ रेल्वेने घेऊन जाणे हा गुन्हा आहे. अशा प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, एक हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे दिवाळीसाठी गावी जाताना फटाके सोबत नेण्याचा मोह टाळा. आपल्या आनंदासाठी इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.