Alisha Khedekar
साध्या चहामध्ये थोडे तूप मिसळून प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. तुपातील फॅट्समुळे पोट भरल्यासारखे वाटू शकते.
तुपामध्ये कॅलरीज आणि फॅट्स असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
तुपातील फॅटी अॅसिड्स शरीराला पोषण देतात. मात्र तूपाचा चहा प्यायल्याने त्वचा चमकदार होते, याचे ठोस पुरावे नाहीत.
ज्यांना चहाची चव आवडते आणि आहारात अतिरिक्त फॅट्सची गरज आहे, ते मर्यादित प्रमाणात घेऊ शकतात.
कोलेस्टेरॉल, हृदयविकार किंवा वजनवाढीची समस्या असणाऱ्यांनी नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
चहामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा तूप घालून पाहू शकता. अतिरिक्त साखर टाळणे अधिक चांगले.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा