Healthy Lifestyle : शौचास बसताना तुम्हीही करता का 'ही' चूक? आजच सुधारा नाहीतर आयुष्यात येईल भयानक संकट

Health Care Update News : शौचालयात जास्त वेळ बसण्याची सवय आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. बद्धकोष्ठता, मूळव्याधीचा धोका आणि पचनसंस्थेचे आरोग्य याबद्दल जाणून घ्या.
Common toilet habits that increase hemorrhoid risk
Common toilet habits that increase hemorrhoid riskAI Image
Published On: 

दैनंदिन जीवनात आपण अनेक छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. यामध्ये शौचालयात बसण्याच्या सवयीचाही समावेश होतो. अनेकांना शौचास बसल्यानंतर मोबाईल वापरण्याची सवय असते. तर काही जण बराच वेळ टॉयलेटमध्ये बसून राहतात. मात्र, तुमची ही सवय आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का?

अनेक जण बाथरूममध्ये बसल्यानंतर मोबाईलवर व्हिडीओ पाहतात किंवा सोशल मीडिया स्क्रोल करतात. यामुळे नकळत टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसून राहण्याची सवय लागते.बराचवेळ बाथरूममध्ये बसल्यामुळे रक्तवाहिन्यांवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे मूळव्याध (पाइल्स) होण्याचा धोका वाढू शकतो. शौचास होत नसताना अनेक जण जोर लावतात. मात्र, असे करणे टाळावे.

Common toilet habits that increase hemorrhoid risk
Political News : मोठी बातमी! खासदारांच्या घराची रेकी केली अन् मध्यरात्री हल्ला करून फरार; भाजप कार्यकर्त्यांवर आरोप

वारंवार जोर लावल्यामुळे मूळव्याधसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.यावर उपाय म्हणजे जर तुम्हाला बाथरूमला होत नसेल तर दिवसातून भरपूर पाणी प्या. याशिवाय पोटाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात फळे, भाज्या, कडधान्ये आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.

Common toilet habits that increase hemorrhoid risk
Gold Rate Today : लक्ष्मीपूजनापूर्वी सोन्याच्या दरात मोठा बदल; १ तोळा सोन्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा 18k,22k,24k चे ताजे दर

तसेच नियमित शारीरिक हालचाल करा. शौचालयात घाई करू नका, पण विनाकारण जास्त वेळही बसू नका. रक्तस्राव, सतत बद्धकोष्ठता किंवा वेदना जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. छोट्या सवयींमध्ये बदल करून तुम्ही पचनसंस्थेचे आरोग्य चांगले राखू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.