समृद्धी महामार्गावर प्रवास करताय? उद्यापासून ७ सप्टेंबरपर्यंत 'या' वेळेत वाहतूक ठप्प; वाचा महत्त्वाचे अपडेट

Samruddhi Mahamarg :मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६ दरम्यान तांत्रिक व दुरुस्तीच्या कामांसाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकच्या वेळा, वाहतूक वळवण्याचे मार्ग आणि महत्त्वाच्या सूचना जाणून घ्या.
Samruddhi Mahamarg :
Samruddhi Mahamarg :Samruddhi Mahamarg :
Published On

Samruddhi Mahamarg traffic block : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून (Samruddhi Mahamarg) प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महामार्गावरील तांत्रिक आणि दुरुस्तीच्या कामांसाठी ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने विशेष 'वाहतूक ब्लॉक' (Traffic Block) घेतला जात आहे.

८ दिवसांच्या कालावधीत विशिष्ट तासांसाठी महामार्गावरील ठराविक टप्प्यांवर वाहतूक रोखली जाणार आहे. काही मार्गांवरील गाड्यांची वाहतूक वळवण्यात आली आहे. गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते, अशा वेळी हा ब्लॉक घेतला जात आहे. त्यामुळे प्रवाशांनी ऐनवेळी होणारी गैरसोय आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक टप्प्याटप्प्याने आणि विशिष्ट तासांसाठीच घेतला जाईल. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर वाहनांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Samruddhi Mahamarg :
Malshej Ghat : माळशेज घाट मार्ग पुर्ण बंद; पर्यायी मार्गांवर रात्रभर वाहतूक कोंडी, पर्यटकांचे हाल

ब्लॉकचा कालावधी: ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर २०२६

दुपारी १२:०० ते दुपारी ०३:०० आणि दुपारी ०४:०० ते सायंकाळी ०६:०० (दररोज ठराविक टप्प्यांत २ ते ३ तासांचे ब्लॉक)

नाशिक आणि ठाणे/इगतपुरी जोडणाऱ्या टप्प्यांवर तसेच शिर्डी ते भरणे/इगतपुरी यादरम्यानच्या उड्डाणपुलांच्या कामांच्या ठिकाणी वाहतूक थांबवली जाईल.

काम सुरू असताना सुरक्षेचा उपाय म्हणून दोन्ही बाजूंची वाहतूक १५ ते ३० मिनिटांच्या अंतराने पूर्णपणे रोखली जाईल.

ब्लॉकच्या कालावधीत काही ठिकाणी वाहतूक जुन्या मुंबई-नाशिक महामार्गावरून (NH-60 / NH-3) वळवण्यात येणार आहे.

ज्या भागात काम सुरू आहे, तेथे वाहनांचा वेग ताशी ४० ते ५० किमी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Samruddhi Mahamarg :
Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com