IRCTC Tour Package : तुम्हालाही ज्योतिर्लिंग व तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यायचे असेल तर IRCTC चा हा नवा टूर प्लान फायदेशीर ठरेल. IRCTC ने ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आता एकाच वेळी आपल्याला बालाजी व ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेता येऊ शकते.
भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून 'तिरुपती बालाजी विथ मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग यात्रा' सुरु होणार आहे. या टूर पॅकेजचा प्रवास हा १७ जुलै २०२३ पासून बिलसापूर स्टेशनपासून सुरु होईल.
याबाबतची माहीती IRCTC ने ट्विट करुन दिली आहे. हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचे असेल. यामध्ये फक्त पैसे (Money) द्यावे लागतील व त्यानंतर प्रवाशांना खाण्यापिण्याची व राहण्याची काळजीची गरज नाही.
1. कसा असेल प्रवास ?
हा प्रवास भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमधून होणार आहे. या विशेष ट्रेनमध्ये प्रवास करणारे प्रवासी बिलासपूर, भाटापारा, टिल्डा नेवारा, रायपूर, दुर्ग, राजनांदगाव, गोंदिया, तिरोरा, भंडारा रोड, नागपूर, सेवाग्राम, बल्हारशाह स्थानकांवरून उतरू शकतील. पॅकेजच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, स्लीपर क्लासमधील प्रति व्यक्ती खर्च 11,430 रुपये आहे.
2. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात आहे, जे भगवान शिवाच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. श्रीमल्लिकार्जुन मंदिर श्रीशैल पर्वतावर कृष्णा नदीच्या काठावर आहे. त्याला दक्षिणेचा कैलास म्हणतात. या ठिकाणाचा महिमा अनेक शास्त्रांमध्ये सांगितला आहे. महाभारतानुसार श्रीशैल पर्वतावर शंकराची पूजा केल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते. श्रीशैल शिखराचे दर्शन घेतल्याने भक्तांचे सर्व प्रकारचे दुःख दूर होतात असे काही ग्रंथांमध्ये लिहिले आहे.
3. तिरुपती बालाजी मंदिर
तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati Balaji Mandir ) आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. येथे भगवान विष्णूला समर्पित मंदिर आहे.
4. टूर पॅकेज
पॅकेजचे नाव- तिरुपती बालाजी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग यात्रा (SCZBG02A)
कुठे जाता येईल - तिरुपती आणि श्रीशैलम
टूर कालावधी- 6 दिवस/5 रात्रीची
टूरची तारीख- 17 जुलै 2023
श्रेणी- Economy
5. या टूर पॅकेजसाठी बुकिंग कसे करायचे
टूर पॅकेज बुकिंग करण्यासाठी IRCTC वेबसाइट irctctourism.com ला भेट देऊन ऑनलाइन बुक करता येऊ शकते.
याशिवाय आयआरसीटीसी टुरिस्ट फॅसिलिटेशन सेंटर, झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमधूनही बुकिंग करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.