Bali Tour Package : IRCTC चं नव टूर पॅकेज ! पावसाळ्यात अनुभवा इंडोनेशियाचे नयनरम्य सौंदर्य, बुकिंग कसे कराल ? जाणून घ्या

IRCTC Indonesia Tour Package : तुम्हाला पावसाळ्यात एखाद्या नयनरम्य ठिकाणी पर्यटनासाठी जाण्याची इच्छा असेल तर...
Bali Tour Package
Bali Tour PackageSaam Tv
Published On

IRCTC Bali Tour Package : तुम्हाला पावसाळ्यात एखाद्या नयनरम्य ठिकाणी पर्यटनासाठी जाण्याची इच्छा असेल तर ही बातमी तुमच्या कामाची ठरू शकते. आयआरसीटीसी तुमच्या करिता घेऊन आलंयं एक दिमाखदार टूर पॅकेज.

ज्यामध्ये तुम्ही लखनऊ ते बाली पर्यटनाचा (Tour) आनंद घेऊ शकता. हे टूर पॅकेज ३० जून ते ५ जुलै या सहा दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. तेव्हा या टूर पॅकेजमध्ये (Tour Package) तुम्हाला कोणत्या सुविधा मिळणार आहेत? याचा एकूण खर्च किती असणार आहे जाणून घ्या.

Bali Tour Package
Monsoon Trek : पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा प्लान करताय? महाराष्ट्रातील ही 5 ठिकाणे ठरतील बेस्ट!

1. IRCTC Bali Tour Package Deatils-

  • पॅकेजचे नाव : Awesome Bali Ex Lucknow

  • पॅकेजचा कालावधी : ६ दिवस, ५ रात्री

  • प्रवासाचा मार्ग : हवाई

  • मुक्काम : बाली(इंडोनेशिया)

  • टूरचा दिवस : ३० जून २०२३

2. प्रवासात मिळणार या सुविधा-

1. मुक्कामासाठी 4 स्टार हॉटेलची सुविधा उपलब्ध.

2. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा उपलब्ध.

3. फिरण्यासाठी AC वाहनाची सोय.

4. ट्रिपमध्ये टूर गाइडची देखील व्यवस्था.

5. सोबतच प्रवास विम्याची देखील सुविधा उपलब्ध.

Bali Tour Package
Place To Visit in Rainy Seasons : पावसाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील ही ठिकाणे आहेत बेस्ट !

3. संपूर्ण पॅकेजची एकूण किंमत (Price)-

  • जर तुम्ही या ट्रिपवर एकटे (SOLO) येणार असाल तर, तुम्हाला एकूण ११,५८०० रुपये भरावे लागतील.

  • जर दोन व्यक्ती येणार असतील तर तुम्हाला १,०५,९०० रुपये भरावे लागतील.

  • जर तीन लोक येणार असतील तर दर व्यक्तिला १,०५,९०० रुपये भरावे लागतील.

  • लहान मुले सोबत असतील तर तुम्हाला त्यांच्या वयानुसार म्हणजेच, (5-11 वर्षे) १००६०० आणि विना बेड ९४,४०० रुपये इतकी रक्कम भरावी लागेल.

4. IRCTCने ट्विट करून दिली माहिती-

आयआरसीटीसीने आपल्या ऑफिशीयल ट्विटर हँडलवर आपल्याला जर बालीच्या नयनरम्य सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर, आयआरसीटीसीच्या या शानदार पॅकेजचा लाभ घ्या." असे ट्विट करत ही माहिती दिली.

5. अशी करू शकता बुकिंग-

तुम्ही आयआरसीटीसीच्या ऑफिशीयल वेबसाईटवर जाऊन बुकिंग करू शकता. याशिवाय, आयआरसीटीसीच्या पर्यटक सुविधा केंद्रातून, सुविधा कार्यालयातून आणि क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून देखील बुकिंग करता येऊ शकते. या पॅकेज संबंधित इतर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आयआरसीटीसीच्या ऑफिशीयल वेबसाईटला भेट देऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com