IRCTC Nepal Package saam
लाईफस्टाईल

IRCTC Nepal Package: पत्नी,गर्लफ्रेन्डसोबत क्वालिटी टाईम घालवायचय? मग नेपाळचं खास पॅकेज घ्या; ऑफर ऐकून तुम्हीही म्हणाल 'एक नंबर'

Bharat Jadhav

तुम्हाला परदेशात फिरायला जायचं, तेही शांत आणि निसर्गरम्य तर नेपाळ देश पर्यटनासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. दरवर्षी भारतातून लाखो लोक नेपाळला भेट देतात. बाराही महिने नेपाळमध्ये पर्यटक जातात. नेपाळमध्ये काठमांडू, पोखरा यांसह अनेक ठिकाणे आहेत जेथे पर्यटक भेट देतात. दरम्यान नेपाळला जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी हिल स्टेशन्सला पर्यटकाची खूप पसंती असते. भारतीयांच्या आनंद द्विगुणित करण्यासाठी भारतीय टूर आणि ट्रॅव्हल कंपन्याही नेपाळबाबत पॅकेजेस सुरू करताहेत.

दरम्यान आयआरसीटीसी नवनवीन ऑफर उपलब्ध करून देते. IRCTC ने नुकतेच नेपाळसाठी विशेष पॅकेज लाँच केलंय. या पॅकेजचे नाव आहे CLASSIC NEPAL EX CHENNAI. तसेच (SMO36) हा पॅकेजचा बुकिंग कोड आहे. नेपाळचे हे पॅकेजची ऑफर 15 ऑगस्टपासून सुरू होईल. हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांचं आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला इंग्रजी भाषिक टूर गाइड देखील मिळणार आहे. याशिवाय पॅकेजमध्ये IRCTC टूर मॅनेजरची सेवाही उपलब्ध असणार आहे.

या पॅकेजमध्ये तुम्ही विमानाने नेपाळला जाऊ शकाल. विस्तारा एअरलाइन्सच्या इकॉनॉमी क्लास तिकिटासह, तुम्ही चेन्नई ते काठमांडू मार्गे दिल्ली असा प्रवास करू शकता. नेपाळच्या या पॅकेजमध्ये तुम्ही नेपाळची राजधानी काठमांडू आणि पोखरा येथे जाऊ शकता. पॅकेजमध्ये तुम्ही काठमांडूमध्ये 3 रात्री आणि पोखरामध्ये 2 रात्री राहू शकाल.

विशेष म्हणजे या पॅकेजमध्ये जेवण देखील दिले जाईल, ज्यामध्ये 5 वेळा नाश्ता, 5 वेळा दुपारचे जेवण आणि 5 वेळा रात्रीचे जेवण दिले जाईल. एकदा क तुम्ही याशिवाय नेपाळमध्ये पोहोचलात तर एसी वाहनातून तेथील ठिकाणे दाखवले जातील. सर्वात भारी गोष्ट म्हणजे प्रेक्षणीय स्थळांच्या प्रवेश तिकिटांचाही दरही या पॅकेजच्या किमतीत समाविष्ट करण्यात आलाय. तुमचे वय ५९ वर्षांपर्यंत असल्यास तुम्हाला या पॅकेजमध्ये प्रवास विमा देखील मिळेल.

विशेषता आणि सोयी ऐकल्यानंतर आता तुम्ही पॅकेजच्या किमतीची माहिती पाहात असाल, काळजी नको आम्ही या लेखात संपूर्ण माहिती दिलीय. हे पॅकेज बुक करण्यासाठी IRCTC ने एका व्यक्तीसाठी 61,500 रुपये घेते. तर दोन लोकांसाठी या शेअरिंग पॅकेजचे भाडे 54,000 रुपये आणि 3 लोकांसाठी 53,500 रुपये आहे. तुम्ही तुमच्यासोबत मुलांना नेपाळला घेऊन गेलात तर तुम्हाला त्यासाठी 46,800 ते 42,800 रुपये भाडे द्यावे लागेल.

या पॅकेजची बुकिंग प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा या नियमावर आधारित आहे. तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरूनही पॅकेज ऑनलाइन बुक करू शकता. पॅकेजचा बुकिंग कोड (SMO36) आहे. जर तुम्हाला ऑफलाइन बुकिंग करायची असेल तर तुम्हाला IRCTC ऑफिसमध्ये जावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : एअरफोन वापरल्याने चेहर्‍याला मारू शकतो लकवा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Mrunal Thakur: आंखों ही आंखों में इशारा हो गया...

Bhumi Pednekar: भूमी पेडणेकरच्या नव्या लूकची चर्चा, नेटकऱ्यांनी उर्फीसोबत केली तुलना

Heart Attack Treatment : हार्ट अटॅकवर उपचार तुमच्या जवळच्या रुग्णालयात; मोफत औषध उपलब्धही होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

Dream Recorder: आता तुमचं स्वप्न रेकॉर्ड होणार? प्लेबॅक करून पुन्हा पाहता येणार स्वप्न? शास्त्रज्ञांनी शोधलं मशीन; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT