PM Modi Nepal Visit : बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (आज) नेपाळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नेपाळचे (Nepal) पंतप्रधान शेर बहादूर देउबा (Sher Bahadur Deuba, Prime Minister of Nepal and President of Nepali Congress) यांनी पंतप्रधानांना नेपाळला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार आता पंतप्रधान मोदी (PM Modi) नेपाळला भेट देणार असून अनेक कार्यक्रमांमध्येही ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी लखनऊमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या निवासस्थानी देखील जाणार आहेत. याठिकाणी ते यूपीच्या मंत्र्यांची बैठक घेतील. (India-Nepal PM to meet; PM Modi on a visit to Nepal)
हे देखील पाहा -
या दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी दिल्लीहून सर्वप्रथम कुशीनगरला पोहोचले. त्यानंतर तेथून एम-17 हेलिकॉप्टरने नेपाळला रवाना झाले. संध्याकाळी पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर कुशीनगरमध्ये उतरेल, तेथून ते लखनौला जातील.
असा असेल पंतप्रधानांचा नेपाळ दौरा
- पंतप्रधान मोदी सकाळी १० वाजता लुंबिनीला पोहोचतील.
- सकाळी १०:२० वाजता मोदी मायादेवी मंदिराला भेट देतील
- सकाळी वाजता बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या पायाभरणी कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत
दुपारी १२:२० वाजता द्विपक्षीय बैठक होईल
- दुपारी दोन वाजता पंतप्रधान बुद्ध जयंती कार्यक्रमाला संबोधित करणार
पंतप्रधानांचा कुशीनगर दौरा असा असेल
- नेपाळहून परतल्यावर पंतप्रधान मोदी कुशीनगरला जाणार आहेत.
- दुपारी ४.०५ वाजता मोदी कुशीनगर विमानतळावर पोहोचतील.
- दुपारी ४ः२० वाजता महापरिनिर्वाण स्तूपाकडे जातील
पंतप्रधान मोदी रात्री लखनौला जाणार आहेत. येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांचीही बैठक घेणार आहेत. मुख्यमंत्री योगी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीत मोदी यूपीच्या मंत्र्यांना सरकारचे प्राधान्य आणि सुशासन याविषयी सांगतील. योगी सरकार २.० च्या मंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींची ही पहिलीच भेट असेल.
लखनऊमध्ये मंत्र्यांसोबत करणार डिनर: लुंबिनी आणि कुशीनगरला भेट दिल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट लखनौला पोहोचतील. आज (सोमवारी) संध्याकाळी सहा वाजता ते कालिदास मार्गावर येतील, जिथे त्यांचा योगी आदित्यनाथ यांच्या दुसऱ्या टर्ममधील सर्व मंत्र्यांसोबत डिनरचा कार्यक्रम आहे. सीएम योगी यांच्या निवासस्थानी दुसऱ्यांदा डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. याआधी २०१७ मध्ये म्हणजे पहिल्या टर्ममध्ये सरकार स्थापन झाल्यानंतरही पंतप्रधानांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये मंत्र्यांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. ज्यामध्ये मुलायमसिंह यादव, मायावती आणि अखिलेश यादव देखील होते. तेव्हा निमंत्रण दिलेल्यानंतर फक्त मुलायमसिंह यादव आले होते.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.