कोरोनाने टेन्शन वाढवलं! देशातील रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; मृत्यूचा आकडाही वाढला!

India Corona Updates : रविवारी देशभरात कोरोनाचे 2 हजार 202 नवे रुग्ण आढळून आले
India Corona Update
India Corona UpdateSaam Tv
Published On

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून देशात कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या (Corona Patient) पुन्हा एकदा वाढण्यास सुरूवात झाली आहे. दैनंदिन कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक ठिकाणी मास्क घालणे देखील बंधनकारक करण्यात आलं आहे. अशातच गेल्या 24 तासांत देशभरात 2 हजार 202 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर यादरम्यान, 27 जणांचा मृत्युही झाला आहे. (India Corona Updates 16th May 2022)

India Corona Update
Parbhani : परभणीत १०० हून अधिक जणांना लग्नाच्या अन्नातून विषबाधा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी देशभरात कोरोनाचे 2 हजार 202 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची सक्रिय संख्या 17 हजार 317 इतकी झाली आहे. दुसरीकडे 27 रुग्ण उपचारादरम्यान दगावल्याने मृतांची संख्या 5,24,241 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या कोरोनाची 0.04 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. दुसरीकडे कोरोनापासून बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) 98.74 टक्के इतका आहे.

दरम्यान, एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत 4,25,82,243 इतक्या रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशात आतापर्यंत 1,91,37,34,314 जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. लसीकरणाच्या आकड्यातही दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com